मुंबई : आपली कार घेऊन कुठे ही फिरण्यासाठी जाण्याची मज्जा वेगळीच असते. कारने फिरत असताना निसर्गाला अधिक जवळून अनुभवता येते. विमानाने प्रवास करताना यासर्व गोष्टी अनुभवता येत नाही. अनेकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रस्ताने कार घेऊन जाणं अधिक आवडतं. त्याचा अनुभव वेगळाच असतो. पण तुम्हाला माहित आहे का तुम्ही कारने 7 देशांचा प्रवास करु शकतात.
नेपाळ ( Neapl )
नेपाळ : भारतातून नेपाळला रोड ट्रिपने जाताना सुंदर अनुभव मिळतो. अनेक सुंदर नैसर्गिक दृष्य अनुभवता येतात. तुम्हाला यासाठी वेगळी परवान्याची गरज नसते. तुम्ही भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह नेपाळमध्ये फिरु शकता. नेपाळमध्ये जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. दिल्लीहून काठमांडूला गेल्यास सोनौली सीमेवरून नेपाळमध्ये जावे लागेल. दिल्ली ते नेपाळ रस्त्याने अंतर 1079 किमी आहे.
थायलंड ( Thailand )
थायलंड : तुम्ही थायलंडला जाण्याचा विचार करत असाल तर विमानाऐवजी गाडीने जा. थायलंडला पोहोचल्यानंतर तुम्हाला इथली संस्कृती अगदी जवळून पाहता येईल. अनेक सुंदर समुद्रकिनारे, चर्च आणि मंदिरे रस्त्यात जाताना पाहायला मिळतील. तुमचे बजेट कमी असले तरी थायलंडमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकता. तुम्हाला व्हिसा आणि विशेष परमिट लागेल. दिल्ली ते थायलंड हे अंतर रस्त्याने 4,138 किमी आहे. त्यासाठी तुम्हाला जवळपास 75 तास लागतील.
भूतान ( Bhutan )
भूतान : भारतीय लोक नेपाळप्रमाणेच भूतानमध्ये सहज प्रवेश करू शकतात. जर तुम्ही भारतातून भूतानला रोडने जात असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. भारतीयांना येथे जाण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसाची गरज नाही. भूतानच्या सीमेवर जाण्यापूर्वी तुमच्या वाहनाचा नंबर नोंदवा. दिल्ली ते भूतान हे अंतर रस्त्याने 1,915 किमी आहे आणि येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 37 तास लागतील.
बांगलादेश ( Bangladesh )
बांगलादेश : बांगलादेश हा भारताचा शेजारी देश आहे. येथे जाण्यासाठी सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे ढाका-चितगाव हायवे. येथे जाण्यासाठी तुम्हाला तुमचा पासपोर्ट घ्यावा लागेल. याशिवाय बांगलादेशी दूतावासातून भारतीयांना सहज व्हिसा मिळतो. दिल्ली ते बांगलादेश हे रस्त्याने अंतर 1,799 किमी आहे आणि त्यासाठी तुम्हाला 32 तास लागतील.
मलेशिया ( Malaysia )
मलेशिया : मलेशियाला देखील तुम्ही कारने जावू शकता. दिल्लीहून क्वालालंपूरला जाण्यासाठी म्यानमार आणि थायलंड या दोन देशांमधून जावे लागते. यासाठी तुमचा पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि व्हिसा सोबत ठेवा. दिल्ली ते मलेशिया हे अंतर रस्त्याने 5,536.6 किमी आहे आणि येथे पोहोचण्यासाठी तुम्हाला 95 तास लागतील.
श्रीलंका ( Sri lanka )
श्रीलंका : दिल्लीहून रोडने तुम्ही श्रीलंकेला जाऊ शकता. तामिळनाडूमध्ये पोहोचल्यानंतर, तुम्ही तुतिकोरिन बंदरापासून श्रीलंकेतील कोलंबो बंदरापर्यंत फेरी (बोट) घेऊ शकता.
तुर्की ( Turkey )
तुर्की : जर तुम्हाला गाडी चालवायला आवडत असेल आणि तुम्हाला खरोखरच लाँग ड्राईव्ह करायची असेल, तर तुमच्यासाठी तुर्की चांगला पर्याय आहे. दिल्ली- ल्हासा (तिबेट)- चीन- किर्गिस्तान- उझबेकिस्तान- तुर्कमेनिस्तान- इराण- तुर्की असा प्रवास करावा लागेल. येथे खूप सुंदर समुद्रकिनारे देखील आहेत. दिल्ली ते तुर्कस्तान हे रस्त्याने अंतर 3993 किमी आहे.