पुलवामा येथे चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

सायंकाळच्या सुमारास पुलवामातील ....

Updated: Oct 22, 2019, 10:01 PM IST
पुलवामा येथे चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या एका चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सायंकाळच्या सुमारास पुलवामातील त्राल येथे असणाऱ्या भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ही कारवाई करण्यात आली. भारतीय सैन्यदल, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली.

विश्वासू हेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी तेथील एका घरात लपलेले होते. ज्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली, तेथून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा ताब्यात घेण्यात आला आहे. ज्यानंतर त्यानजीकच्या परिसरात शोधमोहिम सुरुच आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार आणि आतापर्यंत हाती आलेल्या काही पुराव्यांनुसार हे तिन्ही दहशतवादी पाकिस्तनमध्ये सक्रिय असणाऱ्या जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेतील असल्याचं कळत आहे. 

जम्मू- काश्मीर पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर दोन स्थानिक नागरिकांना जीवे मारण्याच्या प्रकणात या दहशतवाद्यांचा हात होता.