हा Tiffin Box नाही तर एक वॉशिंग मशीन, मिनिटांत चकाचक होतील कपडे

Portable Mini Washing Machine:  तुम्हाला कपडे धुवायचा कंटाळा असेल तर हे मिनी वॉशिंग मशिन तुमचे काम एकदम हलके करणार आहे. हे वॉशिंग मशिन इतके लहान आहे की, एका ठिाकणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. 

Updated: Jul 16, 2022, 02:13 PM IST
हा Tiffin Box नाही तर एक वॉशिंग मशीन, मिनिटांत चकाचक होतील कपडे title=

मुंबई : Portable Mini Washing Machine on Flipkart:  तुम्हाला कपडे धुवायचा कंटाळा असेल तर हे मिनी वॉशिंग मशीन तुमचे काम एकदम हलके करणार आहे. हे वॉशिंग मशीन इतके लहान आहे की, एका ठिाकणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. एका टॅफिन बॉक्सप्रमाणे हे मशिन आहे. साधारण तुमचे तीन ते चार शर्ट सहज धुतले जातील, तेही एकदम चकाचक.

बहुतेक घरांमध्ये वॉशिंग मशीन असते ज्यामुळे तुमचे कपडे दररोज चमकतात. परंतु जे लोक विद्यार्थी आहेत, म्हणजे अभ्यास किंवा नोकरी करतात आणि एकटे राहतात, ते सहसा वॉशिंग मशीन विकत घेत नाहीत आणि स्वतःचे कपडे धुत नाहीत. जर तुम्ही देखील या लोकांमध्ये असाल किंवा तुमच्या घरात फक्त दोन ते तीन लोक असतील तर आमच्याकडे तुमच्यासाठी अशा वॉशिंग मशीनचा पर्याय आहे, जो स्वस्त असण्यासोबतच काही मिनिटांत तुमचे कपडे चमकवेल.  

टिफिन बॉक्स नाही तर वॉशिंग मशीन ! 

जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की 'टिफिन बॉक्स' वॉशिंग मशीनबद्दल. तर आम्ही तुम्हाला सांगतो की आम्ही येथे टेक्नो ऑटोमॅटिक पोर्टेबल फोल्डेबल अल्ट्रासोनिक वॉशिंग मशीनबद्दल बोलत आहोत. ही एक पोर्टेबल वॉशिंग मशीन आहे, जी तुम्ही ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकता. याचा वापर करुन तुम्ही तुमचे कपडे धुण्याबरोबर हे मशिन सहज दुमडून कपाटात ठेवू शकता आणि त्यानंतर ते टिफिन बॉक्ससारखे दिसते. 

 कपडे काही मिनिटांत चमकतील 

टेक्नो ऑटोमॅटिक पोर्टेबल फोल्डेबल अल्ट्रासोनिक वॉशिंग मशीन एक लहान वॉशिंग मशीन आहे, ज्यामध्ये तुम्ही एकावेळी चार ते पाच कपडे धुवू शकता. या मशिन टच कंट्रोल्ससह येते आणि त्याचे एक-बटण ऑपरेशन वापरण्यास अतिशय सोपे करते. फायबरपासून बनवलेले हे वॉशिंग मशीन तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. 

पोर्टेबल फोल्डेबल वॉशिंग मशीनची किंमत 

 हे पोर्टेबल वॉशिंग मशीन कमी किमतीत घरी घेऊन जाऊ शकता. Flipkart वर, हे वॉशिंग मशीन, टेक्नो ऑटोमॅटिक पोर्टेबल फोल्डेबल अल्ट्रासोनिक वॉशिंग मशीन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहे. परंतु 52 टक्के सवलतीनंतर 4,799 रुपयांना मिळत आहे. या मशीनच्या खरेदीवर, तुम्हाला फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2022 साठी कॅशबॅक कूपन देखील दिले जात आहे.