नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या खासदार महुआ मोइत्रा लोकसभेतील आपल्या तिखट भाषणामुळे चर्चेत आल्या होत्या. आता त्यांच्यावर भाषण चोरीचा आरोप लावण्यात येत आहे. हे त्यांचे भाषण नसून चोरी केलेले भाषण असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. पण मोइत्रा यांनी हे आरोप फेटाळले असून यावर निराशा व्यक्त केली आहे. या आरोपांसाठी त्यांनी भाजपाच्या 'ट्रोल सेनेला' जबाबदार धरले आहे. मोइत्रा यांनी संसदेत देशाच्या लोकशाहीपुढे मोदी सरकारने उभी केलेली फॅसिझमची आव्हाने या विषयावरील भाषण खूप वायरल झाले. मोइत्रा यांनी मोदी सरकारवर राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे विभाजन करत वैज्ञानिक विचार मागे टाकण्याचा आरोप केला.
जेव्हा कोणी आपले स्त्रोत सांगत नसेल तेव्हा साहित्यिक चोरी होते. माझ्या वक्तव्यांमध्ये स्त्रोतचा स्पष्ट उल्लेख आहे. मी राजकीय अभ्यासक डॉ. लॉरेंस डब्ल्यू ब्रिट यांच्या होलोकास्ट म्यूझियममध्ये सुरुवातीच्या फॅसिझमच्या 14 संकेतांचा उल्लेख आहे. मी भारतासाठी सात संकेत मिळतेजुळते पाहीले आणि त्याचा विस्तार केल्याचे मोइत्रा म्हणाल्या.
टीएमसी खासदार मोइत्रा यांनी लोकसभेत केलेले भाषण हे 'फॅसीझमचे सुरुवातीचे 12 संकेत' नावाने प्रकाशित आहेत, जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासंदर्भात आहेत. असा आरोप खासदार मोइत्रा यांच्यावर ठेवण्यात आला. वॉशिंग्टन मंथलीचा एक लेख देखील यासोबत ट्वीट करण्यात आला.
मी दिलेल्या भाषणाचा संदर्भातील हा लेख असल्याचे पश्चिम बंगालच्या कृष्णनगरमधून पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आलेल्या मोइत्रा म्हणाल्या. माझ वक्तव्य हे मनापासून होते आणि भारतीयांनी ते मनापासून ऐकले. हे कृत्रिम नसून स्वाभाविक असल्याचे त्या म्हणाल्या. 'बांधने मुझे तू आया है, जंजीर बड़ी क्या लाया है ?' याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.