Gold Rates Today : सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण

जाणून घ्या आजचे दर     

Updated: Oct 23, 2020, 10:58 AM IST
Gold Rates Today : सोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण

नवी दिल्ली :  गेल्या काही दिवसांपासून सोने - चांदीच्या दराने उच्चांक गाठला होता. परंतू गुरूवारी सोने - चांदीच्या दरात घसरण झाली. कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचे दर कमी झाले आहेत. दरम्यान युरोपमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग पुन्हा पसरल्यामुळे कमॉडिटी बाजारात सोने-चांदीचे दर घसरले आहेत. जगात कोरोना रूग्णांच्या संख्येत होणारी वाढ पाहता  सोने, क्रूड आणि बेस मेटलचे दर आणखी घसरण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली. 

goodreturns या वेबसाईटनुसार शुक्रवारी देखील सोने - चांदीच्या दरात घसरण दिसून आली. मुंबईमध्ये २२ सोन्याचा भाव ५० हजार १०० रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे  दर ५१ हजार १०० आहे. दिल्लीमध्ये २२ कॅरेट सोन्याचे दर ४९ हजार ६१० रूपये असून २४ कॅरेट सोन्याचे दर ५४ हजार १२० रूपये आहे. 

त्याचप्रमाणे कोलकाता  आणि चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे ५० हजार ११० रूपये आणि ४७ हजार २०० रूपये आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे  दर ५१ हजार ७१० रूपये आणि ५१ हजार ४९० रूपये आहे.  
 
दरम्यान,  सोन्याच्या दरांमध्ये होत असलेले चढ-उतार पाहता सोन्यात गुंतवणूक करावी की नाही असा प्रश्न ग्राहकांच्या मनात उपस्थित होत आहे. परिणामी  उत्सवांचा हंगाम सुरू असला तरी सोन्याला मागणी नसल्याचं चित्र दिसून येत आहे.