Gold-Silver Price : सोने खरेदी करण्याची आजच संधी, मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने-चांदीचे दर

Gold Rate :  गेल्या काही दिवसापासून सोन्याचा भाव चढाच राहिला आहे . भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदी यांच्या किमतीत वाढच झालेली दिसते. मात्र आज सोन्याच्या दरात किंचीत स्वस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 11, 2023, 11:33 AM IST
Gold-Silver Price :  सोने खरेदी करण्याची आजच संधी, मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या सोने-चांदीचे दर   title=
Todays gold Silver Rate in maharashtra

Gold-Silver Price on 11 April 2023 :  गेल्या महिनाभरापासून सराफ बाजारात सलग तिसऱ्या आठवड्यात सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) दरात चढ-उताराचे सत्र सुरूच आहे. मात्र आज तुम्ही सोने-चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली संधी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या चढ-उतारांमुळे भारतीय सोने बाजारात किंचीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घेऊया 22 आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत किती आहे?

गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे (gold rate) दर आज 55,400 रुपये असून काल (10 एप्रिल 2023 ) 10 ग्रॅमची किंमत 55,790 रुपये होती. तर चांदी 76,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. तर काल हीच चांदी 76,600 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. सोने-चांदी एवढे महाग असताना देखील सोने खरेदीवर प्रचंड भर देत आहेत.  सोने शरीरीवर घालून सर्वत्र मिरवणे ही प्रत्येकाची आवड असते. मात्र वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांची हिरमोड होत असते. 

वाचा: गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या पेट्रोल डिझेलचे दर 

आज मुंबईत (Mumbai Gold Rate) 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमनुसार 55,400 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,430 प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 55,400 असेल आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 60,430 रुपये आहे. नागपुरात 22 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचा दर 55,400 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 60,430 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 55,430 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 60,460 रुपये आहे. तर चांदी आज 76,300 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. 

मिस्ड कॉल देऊन किंमत जाणून घ्या

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने दागिन्यांचा किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. त्यानंतर लगेचच एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. 

अशा प्रकारे सोन्याची शुद्धता जाणून घ्या

आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता.