ट्रायने वाहिनी निवडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली

ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडता येतील.

Updated: Feb 12, 2019, 07:40 PM IST
ट्रायने वाहिनी निवडीची मुदत ३१ मार्चपर्यंत वाढवली title=

मुंबई : ट्रायने वाहिनी निवडीची मुदत पुन्हा एकदा वाढवून दिली आहे. आता ग्राहकांना ३१ मार्चपर्यंत आपल्या आवडीच्या वाहिन्या निवडता येतील. तोपर्यंत सध्याच्या पॅकमध्ये कुठलाही बदल होणार नाही. ३१ मार्चनंतरही ग्राहकांनी वाहिन्यांची निवड केली नाही तर सेवा पुरवणाऱ्याला ग्राहकाच्या सध्याच्या निवडीनुसार सध्याच्या मासिक शुल्कात वाढ न करता 'बेस्ट फिट 'प्लान ग्राहकाला सेवा द्यावी लागेल.

याआधी प्रेक्षकांना नको असलेल्या वाहिन्यांसाठी देखील त्यांना पैसे मोजावे लागत होते. पण ट्रायने चॅनेल निवडीचे स्वातंत्र्य दिले आणि नवा नियम आणला. नव्या नियमानुसार प्रेक्षकांना त्यांच्या आवडते चॅनेल निवडता येणार आहेत. ज्या प्रेक्षकांनी चॅनेल निवडले नाहीत त्यांचे अशा व्यक्तींचे पूर्वीच्या पॅकनुसार चॅनेल सध्या सुरु आहेत. ३१ मार्चनंतर मात्र हे टीव्ही चॅनेल बंद होऊ शकतात.

ग्राहकांना १०० रुपयांचं बेसिक भरणा करावा लागेल. १३० रुपयांचा (टॅक्स सोडून) भरणा केल्यास त्यांना सगळे फ्री टू एअर चॅनेल पाहायला मिळणार आहेत. कोणत्या चॅनेलला किती पैसे तुम्हाला मोजावे लागतील. जाणून घ्या. 

झी नेटवर्क
झी न्यूज- 50 पैसे
झी२४तास - 50 पैसे
झी बिझनेस- 50 पैसे
झी युवा - 10 रुपये
झी टॉकीज - 17 रुपये
झी मराठी - 19 रुपये
झी टीव्ही - 19 रुपये
अँड टीव्ही- 12 रुपये
झी सिनेमा- 19 रुपये
झी अॅक्शन - 1 रुपये
झी ईटीसी- 1 रुपये
झी बॉलिवुड- 2 रुपये
लिविंग फूड्स- 1 रुपये

टाईम्स नेटवर्क
टाइम्स नाऊ- 3 रुपये
मिरर नाऊ- 2 रुपये
ईटी नाऊ- 3 रुपये
झूम- 0.50 रुपये
मुव्ही नाऊ- 10 रुपये
एमएनएक्स- 6 रुपये
रेडमी नाऊ- 6 रुपये

सोनी नेटवर्क
सोनी एंटरनेटमेंट - 19 रुपये
सब टीव्ही- 19 रुपये
सेट मॅक्स- 15 रुपये
सोनी याय- 2 रुपये
सोनी पल- 1 रुपये
सोनी वाह- 1 रुपये 
सोनी मिक्स- 1 रुपये
मॅक्स 2- 1 रुपये

नेटवर्क 18  
सीएनबीसी आवाज- 1 रुपये
कलर्स- 19 रुपये
द हिस्ट्री चॅनल- 3 रुपये
रिश्ते- 1 रुपये
रिश्ते सिनेप्लेक्स- 3 रुपये
वीएच 1- 1 रुपये
एमटीवी- 3 रुपये
एमटीवी बिट्स- 50 पैसे
न्यूज 18 आसाम/नॉर्थ ईस्ट/बिहार,झारखंड/ मध्यप्रदेश, छत्तीसगड- 25 पैसे प्रति चॅनेल

स्टार नेटवर्क 
स्टार उत्सव- 1 रुपये
स्टार गोल्ड- 8 रुपये
मूवीज ओके- 1 रुपये
स्टार स्पोर्ट 3- 4 रुपये
स्टार स्पोर्ट फर्स्ट- 1 रुपये
नॅशनल जियोग्राफिक्स चॅनल- 2 रुपये
नॅट जिओ वाइल्ड- 1 रुपये
स्टार उत्सव मूवीज- 1 रुपये
स्टार स्पोर्ट 1 हिंदी- 19 रुपये
स्टार स्पोर्ट 2- 6 रुपये

डिस्कवरी नेटवर्क
डिस्कवरी चॅनल- 4 रुपये
एनिमल प्लानेट- 2 रुपये
डिस्कवरी जीत- 1 रुपये
डिस्कवरी साइंस- 1 रुपये
डिस्कवरी टर्बो- 1 रुपये
टीएलसी- 2 रुपये
डिस्कवरी किड्स चॅनल- 3 रुपये
डीस्पोर्ट- 4 रुपये

टीव्ही टूडे
आजतक- 75 पैसे
इंडिया टूडे- 1 रुपये 
आजतक तेज- 25 पैसे

एनडीटीव्ही
एनडीटीव्ही 24*7 - 3 रुपये
एनडीटीव्ही प्रॉफिट- 1 रुपये
गूड टाइम्स- 1.50 रुपये
एनडीटीव्ही इंडिया- 1 रुपये

टर्नर इंटरनेशनल प्रायवेट लिमिटेड
कार्टून नेटवर्क- 4.25 रुपये
एचबीओ- 10 रुपये
डब्लूबी- 1 रुपये
पोगो- 4.25 रुपये
सीएनएन इंटरनॅशनल- 50 पैसे

डिज्नी चॅनल
द डिज्नी चॅनल- 8 रुपये
यूटीवी अॅक्शन- 2 रुपये
यूटीवी बिंदास- 1 रुपये
यूटीवी मूवीज- 2 रुपये
डिज्नी एक्सडी- 4 रुपये
हंगामा टीवी- 6 रुपये
डिज्नी जूनियर- 4 रुपये