ITBP जवानांच्या बसला अपघात, अपघातात 6 जवान शहीद, 32 जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात 39 कर्मचारी घेऊन जाणारी सिव्हिल बसचा भीषण अपघात झाला आहे

Updated: Aug 16, 2022, 12:52 PM IST
ITBP जवानांच्या बसला अपघात, अपघातात 6 जवान शहीद, 32 जवान जखमी title=

जम्मू-काश्मीर - ITBP जवानांनी भरलेल्या बसला अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम जिल्ह्यात 39 कर्मचारी घेऊन जाणारी सिव्हिल बसचा भीषण अपघात झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने थेट दरीत कोसळली. ही बस सैनिकांना चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने घेऊत जात असताना दुर्घटना घडली.  

अपघातात 6 जवान शहीद, 32 जवान जखमी झाले आहेत. बसमधील कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. सध्या बचावकार्यासाठी कमांडो घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

अपघातात बळी पडलेले हे जवान अमरनाथ यात्रेची ड्युटी संपवून परतत होते. पहलगामपासून 16 किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी हा अपघात घडला. जिथे ही दुर्घटना घडली ते अमरनाथ यात्रेचा प्रारंभ बिंदू मानलं जातं.