Jugaad असावा तर असा! तुम्ही पण व्हाल Confuse विमान आहे की बाइक?

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बाइकसोबत असा जुगाड केला आहे, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. 

Updated: Aug 7, 2022, 02:33 PM IST
Jugaad असावा तर असा! तुम्ही पण व्हाल Confuse विमान आहे की बाइक? title=
trending news jugaadu idea in bike innovation viral video trending on social media in maratha

Jugaad In Bike : इंटरनेटच्या जगात असंख्य व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. या सोशल मीडियाच्या खजिन्यात जुगाडचे अनेक व्हिडीओ पाहिल्या मिळतात. या व्हिडीओमधील काही जुगाड खरंच कौतुकास्पद असतात. तर काही जुगाड पाहून तर आपल्याला हसू आवरत नाही. जुगाड करण्यामध्ये भारतीयांचा कोणी हात धरू शकत नाही असं म्हणतात. काही लोकांचे डोके इतके चालते की त्यांचा जुगाड पाहून आपल्यालाच चकर येईल. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 

अजब-गजब जुगाड

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने आपल्या बाइकसोबत असा जुगाड केला आहे, ते पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बाइक आहे आणि त्याच्या समोर विमानाला असतात तसे पंख लावलेले आहेत. त्याशिवाय या बाइकला एक प्रोपेलरही (Propeller)जोडण्यात आले आहे. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक व्यक्ती बाइकवर बसलेली आहे आणि दुसरा व्यक्ती हाताने वेगाने पंख फिरवत आहे. या व्हिडीओतील बाइक छोट्या विमानासारखं वाटतं आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्स या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. (trending news jugaadu idea in bike innovation viral video trending on social media in maratha)

सोशल मीडिया प्लेटफॉर्म फेसबुकवर (Facebook)हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला कॅप्शन  (Caption) दिलं आहे की, हा प्रयोग करणारा व्यक्ती एक प्राध्यापक आहे. खरंच अशी बाइक तुम्ही पाहिली नसेल. अवघ्या 3 मिनिटांच्या या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्यूज मिळाले आहेत. तर 20 हजारांहून अधिक लोकांनी तो लाइक केला आहे.