Pitbull Attack:लखनऊनंतर आता मेरठमध्ये पिटबुलची दहशत; मुलावर हल्ला

लखनऊमध्ये  Pitbullने मालकिणीचा जीव घेतल्याची घटना ताजी असताना. शनिवारी पुन्हा अशीच घटना समोर आली आहे.

Updated: Aug 7, 2022, 01:02 PM IST
Pitbull Attack:लखनऊनंतर आता मेरठमध्ये पिटबुलची दहशत;  मुलावर हल्ला title=
trending news pitbull terror in meerut after lucknow minor injured in pitbull attack in maratha

Pitbull Attack :कितीही क्यूट वाटले तरी Pitbull पाळण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. कारण लखनऊनंतर आता मेरठमध्ये पिटबुलची दहशत पसरली आहे. लखनऊमध्ये  Pitbullने मालकिणीचा जीव घेतल्याची घटना ताजी असताना. शनिवारी पुन्हा अशीच घटना समोर आली आहे. मेठरमध्ये पिटबुल कुत्र्याने अल्पवयीन मुलावर हल्ला केला आहे. एवढंच नाही तर मुलाचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या मालकालाही या कुत्र्याने गंभीर जखमी केलं आहे. (trending news pitbull terror in meerut after lucknow minor injured in pitbull attack in maratha)

नेमकी काय घडली घटना?

ही घटना मेरठच्या मवाना भागातील आहे. शनिवारी संध्याकाळी उशिरा Pitbullने सलीम या मुलावर प्राणघातक हल्ला केला. या कुत्र्याने सलीमचा जबडा पडकला ही घटना पाहून शेजाऱ्यांनी आरडाओरडा केला. Pitbull च्या हल्ल्यातून मुलाची सुटका करताना मालकालाही त्याने गंभीर जखमी केले आहे. Pitbull चा स्क्रू ड्रायव्हरने जबडा उघडून सलीमची सुटका करण्यात आली. 

Pitbull मालकाचं स्पष्टीकरण

सलीम हा अनेकदा Pitbullची छेड काढत होता. सलीम Pitbullच्या पायावर पाय ठेवायचा. अशातच संतापलेल्या Pitbullने सलीमवर हल्ला केला, असं स्पष्टीकरण Pitbullच्या मालकाने दिलं आहे. दरम्यान पोलीस या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.