पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशा अनेक गोष्टी नेहमी पाहतो. ज्या आपल्याला अगदी सामान्य वाटतात, पंरतु प्रत्यक्षात त्यामागे काही मोठे आणि खोल कारण दडलेले असतात. ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. रस्त्यांवरून जाताना कडेला असलेली झाडे तुम्ही नक्कीच पाहिली असतील आणि रस्त्यांच्या कडेला असलेली झाडे (Roadside trees) खालच्या बाजूने पांढऱ्या रंगाने रंगवलेली असतात हेही तुमच्या लक्षात आले असेल, या झाडांना विनाकारण पांढरा रंग (trees white color)दिला जात नाही, तर त्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत.
रस्त्यांवरील पांढऱ्या रंगाने झाडे रंगवल्याने त्यांचे आयुष्य (Giving color increases the life of the tree) वाढते. खरे तर झाडांवर लावलेला पांढरा रंग चुना (White color lime) पाण्यात मिसळला जातो, त्यामुळे झाडाला रंग दिल्याने दीमक आणि इतर प्रकारचे कीटक (termite pest) झाडाच्या खोडाला इजा करत नाहीत त्यामुळे झाडाचे आयुष्य वाढते. तसेच झाडाला पांढऱ्या रंग दिल्याने जेथे रस्त्याच्या कडेला पथदिवे (Roadside street lights) नाहीत, तिथे रात्रीच्या अंधारात वाहनचालकांना सहज रस्ता (Easy road for motorists in the dark) लक्षात येतो. घनदाट जंगलात रस्ता दाखवण्यासाठी झाडांवर नेहमीच रंग वापरले जातात.
ज्या झाडांवर रंगरंगोटी ( Coloring on trees )केली जाते ती सर्व झाडे ही सरकारी वनविभागाची मालमत्ता असते. या झाडांचे कोणी नुकसान केल्यास त्याच्यावर वनविभागाकडून कारवाई केली जाते. काही राज्यांमध्ये, झाडांना रंग देण्यासाठी लाल आणि निळा रंग ( Red and blue colors ) देखील वापरला जातो. वनविभाग (Forest Department) आपल्या योजनेनुसार झाडे मोजण्यासाठी त्याचा वापर करतात.
झाडे आपल्याला सावली देतात, परंतु झाडांना खूप तीव्र सूर्यप्रकाश (Sunlight to trees) सहन करावा लागतो जो त्यांच्यासाठी हानिकारक (Harmful) असतो. कडक सूर्यप्रकाशामुळे (Due to strong sunlight) झाडांना भेगा (Split the trees) पडू लागतात आणि हळूहळू त्यांची सालही झाडांपासून (Bark of trees) वेगळी होऊ लागतात. झाडांना पांढरा रंग दिल्यास थेट सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडत नाही, त्यामुळे भेगा पडत नाहीत आणि झाडांची साल बराच काळ तशीच राहते.