Trending Video: क्या बात हैं!आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नेटकरी सुखावले, तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल स्मितहास्य

जगातील सर्व सुख एकीकडे आणि आईच्या चेहऱ्यावरील आनंद एकीकडे...

Updated: Sep 17, 2022, 07:30 PM IST
Trending Video: क्या बात हैं!आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नेटकरी सुखावले, तुमच्याही चेहऱ्यावर उमटेल स्मितहास्य title=

Viral Video: आपण आपल्या आई बाबांकडून विविध गोष्टी मागत असतो. मात्र आपले आई बाबा आआपल्याकडून कधीही काहीही मागत नाहीत. आपली मुलं मोठी व्हावीत, योग्य मार्गावर लागावीत एवढीच त्यांची अपेक्षा असते. आपल्या वाईट काळात केवळ आपले आईबाबांचा आपल्या सोबत असतात. मुलं मोठी झालीत की आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्या व्हिडिओवर views चा पाऊस पडतोय. कारण या व्हिडिओमधील आईच्या चेहऱ्यावरचा आनंद नेटिझन्सना चांगलाच भावला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा आजचा दिवस सार्थकी लागला अशी भावना तुमच्याही मनात निर्माण होईल. 

जगातील सर्वात मोठं सुख कोणतं तर आपल्या आईच्या चेहऱ्यावरील पाहणं. या व्हिडिओमध्ये आपण पाऊच शकतो की एक महिला साडी घालून एक आलिशान  गाडी चालवत आहे. या महिलेच्या चेहऱ्यावरील आनंद सांगतोय कि त्यांना ही गाडी चालवून किती आनंद होतोय. बरं, हा व्हिडीओ एका मुलाने शेअर केला आहे. एका मुलाने आपल्या आईला गाडी चालवायला दिल्याचा हा आनंद आपण स्पष्ट पाहू शकतो. स्वतः मुलाने हा व्हिडीओ शूट केला आहे, हा व्हिडीओ पाहून यावर अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. माझी आई Mahindra XUV 700 चालवतेय असं कॅप्शन यावर लिहिलेलं आहे.या व्हिडिओला 25.1 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओवर तब्बल 18 लाख लाईक्स मिळाले आहेत. या व्हिडिओमधील आईच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अनेकांचा दिचेहर्यावर स्मितहास्य उमटलंय.