IRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा

स्वस्तात मस्त! IRCTC ची भन्नाट ऑफर, पाच दिवसात फिरा तीन देवस्थाने

Updated: Sep 17, 2022, 07:20 PM IST
IRCTC ची भन्नाट ऑफर, स्वस्तात करा 'शिव-शनि- साई' यात्रा

IRCTC Offer: अनेकांना फिरण्याची आवड असते.  सुट्टी मिळाली की अनेक जण फिरण्याचा प्लॅन करतात. अनेकांना ऐतिहासिक तसेच देवस्थांना भेट देण्याची आवड असते. अशातच जिप्सी लोकांसाठी IRCTC ने एक भन्नाट ऑफर दिली आहे.

तुम्हाला धार्मिक स्थळांना भेट द्यायची असेल, तर IRCTC ने एक विशेष पॅकेज जाहीर केलंय. ज्यामध्ये शिर्डीतील साई देवस्थान (Shirdi Sai Baba), शनिशिंगणापूर देवस्थान (Shani Shingnapur) आणि (Trimbakeshwar Jyotirlinga) त्र्यंबकेश्वरच्या ज्योतिर्लिंगाचं समावेश आहे. 

IRCTC ने या विशेष टूर पॅकेजचं नाव 'शिव-शनि- साई' यात्रा असं ठेवलंय. IRCTC ने हे पॅकेज गौरव टूरिस्ट ट्रेनच्या माध्यमातून जाहीर केलंय. या प्रवासात जगप्रसिद्ध एलोरा गुंफा देखील पहायला मिळेल. UNESCO च्या वर्ल्ड हेरिटेज श्रेणीमध्ये या गुंफेचा समावेश आहे.

5 दिवस, 4 रात्रीची यात्रा

या यात्रेसाठी 600 जागा मर्यादित ठेवण्यात आल्या आहे. IRCTC च्या वेबसाईटवर याविषयी स्वीस्तर माहिती देण्यात आली आहे.  तुम्हाला AC 3 मध्ये यात्रा करण्याची संधी मिळेल.

 IRCTC च्या देवदर्शन यात्रेला दिल्लीतून 17 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे. 5 दिवस आणि 4 रात्र अशी ही टूर असणार आहे. IRCTC फक्त प्रतिव्यक्ती 18 हजार 500 रुपयांमध्ये ही व्यवस्था करून दिली आहे.