Viral Video : रिक्षावालाने नादच केला! दोन टायरवर चालवली रिक्षा, पाहा Video

Viral Video : हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.   

Updated: Jan 1, 2023, 11:27 PM IST
Viral Video : रिक्षावालाने नादच केला! दोन टायरवर चालवली रिक्षा, पाहा Video  title=

Auto Viral Video : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ हे खुपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत रिक्षावाला (Auto driver stunt) स्टंन्ट करताना दिसत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 

व्हिडिओत काय?

व्हिडिओत एक हायवे (Highway) दिसत आहे. या हायवेवर एक रिक्षावाला तुफान रिक्षा (Auto driver stunt) चालवत आहे.हा रिक्षावाला सुरुवातील तीन पायावर रिक्षा चालवतो. नंतर हीच रिक्षा एका बाजूला झूकवत दोन पायांवर चालवतो. त्याचा हा स्टंट पाहून हायवेवरच्या अनेक वाहनधारकांना धक्काच बसतो. मात्र हा रिक्षावाला यशस्वी स्टंट करतो. 

दरम्यान या रिक्षावाल्याच्या (Auto driver stunt)  स्टंटमुळे मोठा अपघात होण्याची भीती होती. म्हणजे जर रिक्षा पलटी झाली तर अपघात होण्याची शक्यता होती. कारण मागून येणाऱ्या गाड्या त्याच्यावर धडकण्याची शक्यता होती. मात्र सुदैवाने तसे घडले नाही आणि वाहनधारकांच्या जीवात जीव आला.

हा व्हिडिओ एका मागून येणाऱ्या बाईक चालकाने शूट केला आहे. त्यानंतर हा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 

दरम्यान आता butterfly__mahi या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर जेव्हा माझे बाबा बोलावतात-तेव्हा मी अशाप्रकारे घरी येतो असे सांगण्यात आले आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by MAHI (@butterfly__mahi)

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) प्रंचड व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय.