कौटुंबिक सदस्य गमावला, अरुण जेटलींच्या निधनावर सर्वपक्षीय नेत्यांनी दु:ख केलं व्यक्त

गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत भाजपाच्या नेत्यांनीही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिलीय

Updated: Aug 24, 2019, 01:26 PM IST
कौटुंबिक सदस्य गमावला, अरुण जेटलींच्या निधनावर सर्वपक्षीय नेत्यांनी दु:ख केलं व्यक्त  title=

नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी २४ ऑगस्ट रोजी दुपारी १२.०७ मिनिटांनी निधन झालं. अरुण जेटली यांना ९ ऑगस्टपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मृत्यूसमयी अरुण जेटली ६६ वर्षांचे होते. रुग्णालयात दाखल असताना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यासह अनेक बड्या नेत्यांनी एम्समध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

गृहमंत्री अमित शाह यांच्यासहीत भाजपाच्या नेत्यांनीही अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहिलीय.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, आंध्रपद्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांनी आदरांजली व्यक्त केलीय.