काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, स्फोटात मेजरसह जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे.  

ANI | Updated: Jan 11, 2019, 11:48 PM IST
काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार, स्फोटात मेजरसह जवान शहीद

श्रीनगर : पाकिस्तानकडून पुन्हा सीमेवर गोळीबार करण्यात आला आहे. तसेच दहशवाद्यांकडून करण्यात आलेल्या स्फोटात भारतीय लष्कराचा एक मेजर आणि एक जवान असे दोघेजण शहीद झालेत. जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला.  पाकिस्तान रेंजर्सच्या बॉर्डर अॅक्शन टीमकडून हा गोळीबार करण्यात आला आहे. दरम्यान, दहशतवाद्यांनी आईडी स्फोट घडवून आणला. हे दोघे शहीद झालेत.

पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर दहशतवाद्यांकडून दोन आईडी स्फोटही घडवण्यात आले. याआधी मंगळवारी जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय सेनेच्या गस्त घालणाऱ्या पथकावर दहशतवाद्यांकडून ह्ल्ला घडवून आणण्यात आला. यावेळी दहशतवादी एका ठिकाणी लपले. लपलेल्या दहशतवाद्याना पकडण्यासाठी लष्कराने केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले होते. 

दहशतवाद्यांनी रुपमती आणि पुखराणी या दोन ठिकाणी स्फोट घडवून आणले. पहिला स्फोट दुपारी साडेचारच्या सुमारास तर दुसरा सहा वाजण्याच्या सुमारास झाला. हे दोन स्फोट नियंत्रण रेषेजवळ घडवून आणले, असे एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटले आहे. या घटनेमध्ये जे जवान जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल आलेय. त्याच्यावर उपचार सुरु आहे.