close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन जवान शहीद

 एका नागरिकाचा मृत्यू 

Updated: Oct 20, 2019, 11:28 AM IST
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; दोन जवान शहीद

मुंबई : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेपाशी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. जम्मू आणि काश्मीर येथील कुपवाडा येथील तंगधारमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या बेछूट गोळीबारात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहेत, तर दोन नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन जवानही शहीद झाले आहेत. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार जखमी नागरिकांना तातडीने प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानच्या सैन्यदलाकडून गोळीबारास सुरुवात करण्यात आली. रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास  हा गोळीबार सुरुच होता. 

भारतील हद्दीत पाकिस्तानकडून होणाऱ्या घुसखोरांच्या मदतीसाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं. काही दिवसांपूर्वीसुद्धा नियंत्रणरेषेपाशी करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं होतं.