पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे.

Updated: Jun 22, 2017, 10:24 PM IST
पूँछमधल्या चकमकीत महाराष्ट्राच्या दोन जवानांना वीरमरण  title=

पूँछ : जम्मू काश्मीरमधल्या पूँछमध्ये झालेल्या चकमकीत, महाराष्ट्रातल्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. संदीप सर्जेराव जाधव आणि सावन बालकू माने अशी या शहीदांची नावं आहेत. संदीप जाधव हे औरंगाबादचे आहेत, तर सावन माने कोल्हापूरचे आहेत. या दोघा जवानांना वीरमरण आल्याचं वृत्त समजताच, त्यांच्या गावावर शोककळा पसरली आहे.

पाकिस्तान लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीम म्हणजेच बॅटनं नियंत्रण रेषेवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. पूँछ भागामध्ये बॅटनं घुसखोरी केली असताना त्यांना मदत म्हणून पाकिस्तानी लष्करानं गोळीबार केला. यावेळी बॅटच्या सैनिकांनी भारतीय जवानांवर हल्ला केला त्यामध्ये भारताचे दोन जवान शहीद झाले. भारतीय लष्करानंही बॅटवर हल्ला केला यामध्ये पाकिस्तानचा एक सैनिक ठार झाला तर एक जण जखमी झाला.