आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा

आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा

Updated: Nov 15, 2017, 09:28 PM IST
आता घर बसल्या सीमकार्ड आधार कार्डला लिंक करा title=

नवी दिल्ली : घर बसल्या तुमच्या मोबाईलचं सीमकार्ड आधार कार्डला लिंक करता येणार आहे. टेलिकॉम कंपनीच्या या योजनेला UIDAIनं मंजुरी दिली आहे. ही सुविधा १ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. यामुळे ग्राहकांचे टेलिकॉम कंपन्यांच्या गॅलरीमध्ये जाण्याचं काम वाचणार आहे. मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख ६ फेब्रुवारी आहे. पण सर्वोच्च न्यायालयानं ही मुदत ३१ मार्च २०१७पर्यंत वाढवायला सांगितलं आहे. आत्तापर्यंत तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर आधार डेटाबेसमध्ये आले आहेत.  ओटीपीच्या माध्यमातून मोबाईल नंबर आधारला लिंक करता येणार आहे.