संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.

Updated: Jan 25, 2018, 09:44 AM IST
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून  title=

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होणार आहे. तर केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जाणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा 29 जानेवारी ते 9 फेब्रुवारी असा असेल. तर पुन्हा 5 मार्च ते 6 एप्रिल या कालावधीत होईल.

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प

मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. 29 जानेवारीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पाला सुरूवात होईल.त्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार असल्याची माहिती संसदीय कामकाजमंत्री अनंतकुमार यांनी दिली.

तिहेरी तलाक बंदी विधेयक हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत मंजूर करून घेण्यात सरकारला अपयश आले. त्यामुळे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते मांडले जाईल.