दिल्ली अपघातात ४ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ठार, वर्ल्ड चॅम्पियन गंभीर जखमी

दिल्ली-पानीपत हायवेवर रविवारी सकाळी रस्ते अपघातात चार खेळाडू ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Updated: Jan 7, 2018, 09:19 AM IST
 दिल्ली अपघातात ४ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू ठार, वर्ल्ड चॅम्पियन गंभीर जखमी title=

नवी दिल्ली : दिल्ली-पानीपत हायवेवर रविवारी सकाळी रस्ते अपघातात चार खेळाडू ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

हे सर्व खेळाडू पॉवरलिफ्टर आहेत. यातील एक विश्व चॅम्पिअन राहिला आहे. 

कारचे संतुलन बिघडल्याने ही दुर्घटना घडली आहे. हे खेळाडू स्विफ्ट डिझायर कारमधून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी निघाले होते. कार दिल्लीच्या बाहेर जाताच ही दुर्घटना घडली. 

कारवरील नियंत्रण सुटले 

दिल्ली-पानीपत हायवेवरील सिंधु बॉर्डरवर खेळाडूंचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार डिवायडरवर ठोकली त्यानंतर खांबाला जाऊन ठोकली. यामध्ये कारचा चक्काचूर झाला.  

४ ठार २ जखमी

चारजणांचा जागेवर मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर दोघांना दिल्लीमधील मॅक्स हॉस्पीटलमध्ये भरती करण्यात आले आहे. 

सक्षम यादव जखमी

जखमींमध्ये पॉवर लिफ्टींगचा विश्व चॅम्पियन सक्षम यादव आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीबद्दल काही सांगता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. 

वर्ल्ड चॅम्पिअन सक्षम यादव दिल्लीतील नांगलोई येथे राहतो. बाकी सर्व खेळाडू दिल्लीतील तिमारपुर विभागात राहणारे आहेत. हरीश. टिंकू, सूरज यांचा मृतांमध्ये समावेश आहे.