नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या आव्हानाच्या काळात देशातील एकंदर परिस्थिती पाहता, या संकटसमयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी त्यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवर नवी दिल्ली येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सविस्तर पद्धतीने या आर्थिक पॅकेजमधील तरतुदींची माहिती दिली.
#WATCH Live from Delhi: FM Nirmala Sitharaman briefs the media #Economicpackage https://t.co/qsYh6pCIYW
— ANI (@ANI) May 13, 2020
पंतप्रधानांनी जाहीर केलेलं आर्थिक पॅकेज हे देशाचा आत्मनिर्भर करण्याचाच दृष्टीने असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी केंद्राकडून यापूर्वी देण्यात आलेल्या काही योजना आणि आर्थिक तरतुदींचा उल्लेखही केला. सरकारी बँका भ्रष्टाचारमुक्त करण्यापासून ते जनधन योजनेबाबतच त्यांनी यावेळी भाष्य केलं.
In a major initiative, we announce Rs 3 lakh crores collateral-free automatic loans for businesses, including SMEs. Borrowers with up Rs 25Cr outstanding and Rs100 Cr turnover are eligible: Finance Minister Nirmala Sitharaman #EconomicPackage pic.twitter.com/56YHRLl1bz
— ANI (@ANI) May 13, 2020
MSME उद्योगांना तीन लाख कोटींचं कर्ज देणार असल्याची घोषणा सीतारमण यांनी केली. याअंतर्गत सूक्ष्म, लघु, मध्यम आणि कुटीर उद्योगांसाठी तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज देण्यात येईल. याकरता कोणत्याही प्रकारच्या हमीची आवश्कता नसेल. जवळपास ४५ लाख MSME उद्योगांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये एक वर्ष कर्जाचा हप्ता भरण्याचीही गरज नसेल.
EPFच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय यावेळी सीतारमण यांनी मांडला. ज्यामध्ये १५ हजारांपर्यंत पगार असणाऱ्यांना यातून दिलासा मिळणार आहे. पगाराच्या २४ टक्के EPF सरकारकडून देण्यात येणार आहे.
In order to provide more take home salary for employees and to give relief to employers in payment of PF, EPF contribution is being reduced for businesses & workers for 3 months, amounting to liquidity support of Rs 6750 crores: FM https://t.co/hn4N8oGcAB pic.twitter.com/gIFqHv1oqH
— ANI (@ANI) May 13, 2020
संकटाच्या या प्रसंगी कर्मचाऱ्यांच्या हाती पैसे राहावेत या उद्देशाने पीएफ योगदान आहे बारा टक्क्यांहून कमी करत पुढील तीन महिन्यांसाठी दहा टक्के करण्यात आलं आहे.
TDS/TCS rates to be reduced by 25% till March 31, 2021: FM pic.twitter.com/kRdS7yG3T9
— ANI (@ANI) May 13, 2020
.ईपीएफच्यामागोमागत सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या या नव्या आर्थिक पॅकेजमध्ये टीडीएस दरात कपात करण्यात आल्याचीही घोषणा करण्यात आली. आर्थिक वर्ष २०२०-२०२१ साठी टीडीएस दरात २५ टक्क्य़ांनी कपात करण्यात आल्याही माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.