पाकव्याप्त काश्मीरबाबत खासदार कपिल पाटील यांचं मोठं विधान, पाहा काय म्हणाले?

केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत (Pakistan Occupied Kashmir) मोठं विधान केलं आहे.   

Updated: Jan 30, 2022, 04:00 PM IST
पाकव्याप्त काश्मीरबाबत खासदार कपिल पाटील यांचं मोठं विधान, पाहा काय म्हणाले?  title=

कल्याण : केंद्रीय राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील (Kapil Patil) यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरबाबत (Pakistan Occupied Kashmir) मोठं विधान केलं आहे. खासदार पाटील यांनी केलेल्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे. पाकव्याप्त असलेला  काश्मीरचा भाग हा 2024 पर्यांत भारतात येईल, कारण या गोष्टी पंतप्रधान मोदीच (PM Narendra Modi) करु शकतात, असा आशावाद खासदार पाटील यांनी व्यक्त केला. ते कल्याणमध्ये बोलत होते. (union minister of state and bhiwandi lok sabha constituency mp kapil patil big statement on pakistan occupied kashmir)

काश्मिरमधील कलम 370 हा विशेष राज्याचा दर्ज्याचा कलम आणि 35 ए हे कलम हटवण्यात आले. यानंतर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती. विरोधकांच्या या टीकेला प्रत्त्युतर म्हणून पंतप्रधान मोदींनी पी व्ही नरसिंह राव यांचां संदर्भ दिला होता. या घटनेची खासदार पाटील यांनी आठवण करुन दिली.

खासदार पाटील जे म्हणाले ते जसंच्या तसं...

"मला आठवंत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांचा उल्लेख केला. तेव्हा नरसिंहराव यांनी पार्लामेंटचं विशेष अधिवेशन बोलावलं होतं. या अधिवेशनात नरसिंहरावांनी कायदा मंजूर करुन घेतला. त्यामध्ये  काश्मिर ही मोठी समस्या आहे. पाकिस्तामध्ये असलेला काश्मिरचा भाग हा आपल्या ताब्यात घ्यायला हवां, त्यानंतर हा प्रश्न निकाली निघेल. यावर मोदी तेव्हा म्हणाले होते की हे काम तुमचंच आहे. तुमच्याकडून झालं नाही म्हणून आम्ही करतोय", असं खासदार पाटील यांनी स्पष्ट केलं. कल्याणमध्ये एका व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. या व्याख्यानमालेत खासदार पाटील यांनी हे विधान केलं.

कपिल पाटील यांच्याबद्दल थोडक्यात

कपिल पाटील यांनी 2014 मध्ये काँग्रेसचा हात सोडत भाजपचं कमल हातात घेतलं. कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास गल्ली ते दिल्ली असा राहिला आहे. ग्रामीण भागातील समस्यांपासून ते दिल्लीपर्यंतच्या राजकारणाचा त्यांना अनुभव आहे. 

कपिल पाटील यांच्या राजकीय प्रवासाची सरंपंचपदापासून सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य पदाची जबाबदारीही यशस्वरित्या पार पाडली. 

कपिल पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सुरेश टावरे यांना पराभूत करत बाजी मारली. त्यानंतर आता काही महिन्यांपूर्वीच नरेंद्र मोदी सरकार 2 चा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यामध्ये त्यांना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.  

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x