रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली

'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

Updated: Jun 13, 2020, 07:33 AM IST
रेस्टॉरंट्स, धार्मिक स्थळे, मॉल आणि कार्यालये यासाठी सरकारची नवीन नियमावली title=

मुंबई : 'अनलॉक -१' दरम्यान कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी रात्री रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, धार्मिक स्थळे, शॉपिंग मॉल्स आणि कार्यालये यासाठी एक नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

यापूर्वी चार जून रोजी मंत्रालयाने सरकारी व निमशासकीय परिसरांसाठी प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) जारी केली होती, परंतु आता जनतेला हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मंत्रालयाने रंगीबेरंगी छायाचित्रांचे मार्गदर्शक सूचना नव्या स्वरूपात जारी केल्या आहेत.  त्यात ते पुढे म्हणाले, "जसे आपण अनलॉक -1 मध्ये पुढे जात आहोत, कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यासाठी आम्हाला यापुढे नेहमीच योग्य कोविड नियम पाळणे आवश्यक आहे. 

सर्वसाधारणपणे, पुढील खबरदारी घ्या

- चेहरा झाकण्यासाठी फेस मास्क किंवा कापड वापरणे बंधनकारक आहे.
- सोशल डिस्टेंसिंग (एकमेकांमधील ठरावीक अंतर) पाळणे महत्वाचे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावर निर्बंध 
- साबण / सॅनिटायझरद्वारे नियमित काही वेळाने वारंवार हात धुणे.
- सार्वजनिक ठिकाणी वावरताना दुसऱ्यापासून किमान ६ फूट अंतर राखणे
- रुमाल किंवा इतर कापडाने तोंड आणि नाक चांगले झाकून घ्या.

धार्मिक स्थळांसाठी या नवीन सूचना

- केवळ लक्षणे नसलेल्या लोकांनाच मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी  
- सॅनिटायझरची व्यवस्था करणे अनिवार्य आहे.
- प्रवेशद्वाराच्या गेटवर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य आहे.
- शूज किंवा चप्पल आपल्या वाहनातून किंवा बाहेर काढाव्या लागतील.
- आत जाण्यापूर्वी हात पाय पूर्णपणे साबणाने धुवावेत.
- आपल्याला सोशल डिस्टेंसिंग (एकमेकांमधील ठरावीक अंतर) नियमांनुसार बसावे लागेल.
- मूर्ती, देव मूर्ती आणि पुस्तकांना स्पर्श करण्यास परवानगी नाही.
- समूह किंवा गटाने भक्तिपर संगीत, गीत गाण्यावर बंदी