लखनऊ : चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीताची सक्ती सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. पण उत्तर प्रदेश सरकारनं राष्ट्रगीतानंतर कुंभ मेळ्याचा लोगो दाखवणं अनिवार्य करण्यात आलं आहे. नागरिकांना धार्मिक आयोजनाचा उद्देश आणि महत्त्व कळावं म्हणून हे पाऊल उचलल्याचं योगी सरकारचं म्हणणं आहे.
राष्ट्रगीतानंतर दाखवण्यात येणाऱ्या या लोगोमध्ये त्रिशूळ, स्वस्तिक आणि एका साधूचा फोटो असलेला लोगो दाखवण्यात येणार आहे. फक्त चित्रपटगृहांमध्येच नाही तर सरकारी पत्रांमध्येही कुंभ मेळ्याचा लोगो छापणं योगी सरकारनं बंधनकारक करण्यात आलं आहे. जानेवारी २०१९मध्ये कुंभ मेळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे.