UP Election Results 2022: उत्तर प्रदेशमध्ये आता मुस्लिम बहुल विभागामध्ये भाजप (BJP)ला होणारा विरोध आता मावळला आहे. उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येताच हे स्पष्ट करणारं चित्र आता समोर आलं आहे.
दुपारी 3 वाजेपर्यंत येथील मतमोजणी सुरुच होती. अशा परिस्थितीमध्ये ऊभाजप 126 जागांवर आघाडीवर असणारा पक्ष ठरला जिथं मुस्लिम मतदारांची संख्या तुलनेनं जास्त होती.
उत्तर प्रदेशातील मुस्लिम मतदार अधिक असणारे जिल्हे
अमरोहा, बुलंदशहर, बरेली, बदायूं, बागपत, बहराइच, लखनऊ, बलरामपुर, सिद्धार्थनगर, बाराबंकी, पीलीभीत, सहारनपुर, श्रावस्ती, रामपुर, मुजफ्फरनगर, बिजनोर, संत कबीर नगर, खीरी, गाजियाबाद, मेरठ, सुल्तानपुर, मुरादाबाद या जिल्ह्यांना मुस्लिम बहुल मतदारसंघ म्हणून ओळखलं जातं.
सदर जिल्ह्यांमध्ये मुस्लिम मतदारांची स्ख्या 20 टक्क्यांहून जास्त आहे. इतकंच नव्हे, तर इथं मुस्लिम वर्गाची मतं निर्णायकही मानली जातात. प्रत्येक निवडणुकीत निरीक्षण हेच सांगतं.
सपाचं स्वप्न भंगलं...
उत्तर प्रदेशात पंतप्रधान मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना जनतेनं प्रचंड बहुमतानं विजयी केलं. ज्यानंतर या भागात एकच जल्लोष पाहायला मिळाला.
भाजपच्या या दणदणीत यशानं सत्ता पुन्हा काबीज करण्याचं सपाचं स्वप्न भंगलं. बहुतांश प्रभागांमध्ये जिथं मुस्लिम बहुल जागा आहेत तिथं भाजपनं बाजी मारली. ज्यामुळं धर्माचं राजकारण करणाऱ्यांसाठी हा मोठा धडा ठरला.
मुस्लिम समुदायाची संख्या जास्त असणाऱ्या बहुतांश मतदार संघांमध्येही भाजपलाच पसंती देण्यात आली आहे. याच धर्तीवर सपाचा स्वप्नभंग झाल्याचं स्पष्ट होत आहे. राष्ट्रीय राजकारणातही हा भाजपचा मोठा विजय मानला जात आहे.