कानपुर : उत्तरप्रदेशच्या कामपूरमध्ये शुक्रवारी रात्री हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. गाडीचे बारा डबे रुळावरुन घसरले असून चार डबे उलटले आहेत. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. 'एएनआय' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास ट्रेनचे कप्लिंग तुटल्यामुळे चालत्या ट्रेनचे १२ डब्बे रुळावरून घसरुन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. धावत्या ट्रेनमध्ये अचानक हा हादसा झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कानपूरपासून २० किलोमीटर असलेल्या रुमाजवळील कस्बे या ठिकाणी हा अपघात झाला.
Kanpur: Morning visuals from the spot where 12 coaches of Poorva Express, plying from Howrah to New Delhi, derailed near Rooma village at around 1 am today. No casualties reported. pic.twitter.com/sFw0jZvVib
— ANI UP (@ANINewsUP) April 20, 2019
हावडा-नवी दिल्ली पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डब्बे कानपुर जवळील रुमा गावालगत रुळांवरून घसरली. यातील चार डबले उलटले असून या दुर्घटनेत २० प्रवासी जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पूर्वा एस्क्प्रेस हावडावरुन दिल्लीकडे जात होती. रेल्वे पोलीस आणि काही सुरक्षा रक्षकांकडून ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात येण्याचे काम सुरु आहे. तसंच जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या प्रवक्ता स्मिता वत्स शर्मा यांनी 'एएनआय'शी बोलताना 'या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आल्याचे' सांगितले. या मार्गावरुन जाणाऱ्या इतर १३ ट्रेनचे मार्ग बदलण्यात आले असून काही ट्रेन रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.