केसगळतीला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या

आर. मिथून राज असे या अभियंत्याचे नाव आहे. मदुराई येथील जयहिंदपुरम येथील घरात पंख्याला गळफास घेऊन या अभियंत्याने आत्महत्या केली.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 2, 2018, 04:58 PM IST
केसगळतीला कंटाळून अभियंत्याची आत्महत्या title=

मदुराई: डोक्यावरील केसगळतीने हैराण झालेल्या एका 27 वर्षीय अभियंत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर. मिथून राज असे या अभियंत्याचे नाव आहे. मदुराई येथील जयहिंदपुरम येथील घरात पंख्याला गळफास घेऊन या अभियंत्याने आत्महत्या केली.

पोलिसांनी दिलेलया माहितीनुसार, आर मिथून राज हा तरूण पेशाने अभियंता होता. तो बंगळुरू येथील , सॉफ्टवेअर कंपनीत काम करत होता. त्याला जडलेल्या त्वचा विकारामुळे त्याच्या डोक्यावरील केस गळत होते. अनेक उपाय करूनही गळती कायम होती. सातत्याने होत असलेल्या केसगळतीमुळे अभियंता आर. मिथून राज हा नैराश्येच्या गर्तेत अडकला होता.

गेले काही दिवस केसकळतीने हैराण असलेला आर. मिथून राज हा स्वत:ला एकटे समजत होता. अखेर नैराश्येच्या भरात त्याने घरातील छताला असलेल्या पंख्यासोबत गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कोणीच नसल्याचे पाहून त्याने आत्महत्या केली. दरम्यान, मंदिरात गेलेली आई घरी परतली असता, आर मिथूनचा देह घरातील पंख्याला लटकताना दिसला.

पंख्याला लटकलेला आर मिथूनचा देह पाहून आईने आरडाओरडा केला. तिचा आरडाओरडा पाहून शेजारीही गोळा झाले. शेजाऱ्यांच्या मदतीने आईने त्याला खाली उतरवून रूग्णालयात दाखल केले. मात्र, रूग्णालयातील डॉक्टरांनी आर. मिथूनला मृत घोषीत केले. जयहिंदपुरम पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.