Crime News : उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंधांदरम्यान मुलीचा मृत्यू झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांचे प्रेमसंबंध होते. आरोपी तरुण शक्तिवर्धक गोळ्या खावून प्रेयसीच्या घरी गेला. शारीरिक संबंधदरम्यान मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने मुलगी बेशूद्ध झाली.
बेशुद् अवस्थेतच त्या मुलीला सोडून तरुण घटनास्थळावरुन फरार झाला. वेळीच उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाला. मुलीचा मोबाईल तपासल्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटमधून सत्य समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणी रावतपूर गावातील रामबरन गौतम उर्फ राजला अटक केली.
तरुणाच्या जबाबातून धक्कादायक माहिती
आरोपी तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत मुलीने आपण घरी एकटीच असल्याचं राजला सांगितलं होतं. राजने मेडिकल शॉपमधून तीन शक्तीवर्धक गोळ्या विकत घेतल्या आणि त्या मुलीला भेटायला जाण्याआधी त्याने त्या खाल्या. मुलीच्या घरी गेल्यानंतर राजने मुलीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने त्याला विरोध केला, पण राज ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता.
मृत मुलीच्या वडिलांनी उपस्थित केले प्रश्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनंतर मृत मुलीच्या वडिलांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शवविच्छेदन अहवालात मुलीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात आलं आहे. कुठच्यातरी वस्तूने मुलीच्या प्रायव्हेट पार्टला दुखापत करण्यात आल्याचा आरोप मृत मुलीच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, डॉक्टरांनीही एखाद्या लोखंडी वस्तूने जखम झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.