परभणीत अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल, गाड्या घसरत असल्याने जीव धोक्यात

परभणी जिल्ह्यात सकाळपासून पावसाची सततधार सुरु आहे.

Updated: Aug 2, 2019, 07:17 PM IST
परभणीत अपूर्ण कामांमुळे रस्त्यांवर चिखल, गाड्या घसरत असल्याने जीव धोक्यात title=

गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी : परभणी जिल्ह्यात सकाळपासून पावसाची सततधार सुरु आहे. जिल्ह्यातले अनेक रस्ते चिखलमय बनल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या बसेस, दुचाकी, चार चाकी गाड्या स्लीप होत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे..

परभणी जिल्ह्यात जिंतूर परभणी, गंगाखेड परभणी अश्या दोन राज्य रस्त्याचे सिमेंट रोडचे काम सुरू आहे. दोन्ही बाजुने रस्ते खोदलेल आहेत.  रस्त्यावर टाकलेल्या खडकाचा चिखल झाला आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिंतूर-परभणी, गंगाखेड-परभणी रस्त्यावर प्रचंड चिखल झाला आहे. त्यामुळे दुचाकींना चिखलाचे पेंड लागत असून बस सुद्धा घसरून रोडच्या खाली उतरत आहे. परळी-परभणी बस चिखलामुळे रोडच्या खालीं उतरत होती. बस चालकाच्या प्रसंगावधणाने मोठी हानी टळली. बस जागेवर थांबवून बस कंट्रोल केली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला. 

दुचाकीस्वारांना तर दुचाकी चालवणं अवघड बनलं असून याच रस्त्यावर सात महिन्याच्या बाळासह दाम्पत घसरून पडल्याची घटना घडली आहे. वाहने स्लिप होत असल्याने सर्वत्र ट्राफिक जाम होत असून 40 किमीच्या प्रवासाला तीन तासाचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशी हतबल झाली आहेत.

जिंतूर ते परभणी या 40 किमीच्या सिमेंट रस्त्यासाठी पावणेतीनशे कोटी रुपयाच्या काम 2017 साली सुरू करण्यात आलं आहे. हे काम 19 सप्टेंबर 2019 रोजी पूर्ण करण्याचे आदेश आहेत. पण गेल्या एक वर्षापासून हे काम रेंगाळल्याने ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल सुरू आहेत. गंगाखेड परभणी रस्त्याच काम ऐन पावसाळ्यात नव्याने सुरू झालं, असून मुरुमाचा चिखल होऊन प्रवाशांना मोठा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे तात्काळ रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे.