पाकिस्तानात तयार झालेले भूसुरूंग लष्कराच्या हाती

भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत पाकिस्तानमधून आलेला शस्त्रसाठा पकडला आहे.  

ANI | Updated: Aug 2, 2019, 06:53 PM IST
पाकिस्तानात तयार झालेले भूसुरूंग लष्कराच्या हाती title=

जम्मू-काश्मीर : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईत मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. यात पाकिस्तानच्या दारूगोळा कारखान्यात तयार झालेला भूसुरूंग आर्मीच्या हाती लागला आहे. आज सकाळी आर्मीच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत आर्मीने तपास सुरू केला आहे. तसेच पाकिस्तान बनावटीची बंदुकही हाती लागली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या आयईडीच्या स्फोटात कोणीही जखमी झाले नाही. एलओसीवरील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आर्मीने जाहीर केले आहे. 

चकमकीत एक जवान शहीद

दरम्यान, जम्मू काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात पांडूशान भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी जोरदार चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. आर्मीची ३४ आरआर ही बटालियन, सीआरपीएफची १४ वी बटालियन आणि काश्मीर पोलीस यांची ही संयुक्त मोहीम आहे. सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले आहे. 

दहशतवाद्यांकडून आईडी स्फोट

आर्मीच्या ५५ आरआरच्या वाहनावर दहशतवाद्यांनी आईडी स्फोट घडवत हल्ला केला. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातल्या झाहीदबाग खेड्यात हा स्फोट झाला. या हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लष्कराने या भागात जोरदार शोधमोहीम सुरू केली आहे. मात्र, जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दले आणि दहशतवादी यांच्यात धुमश्चक्री सुरूच आहे.