व्यंकय्या नायडू १३ व्या उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार

१३ व्या उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

Updated: Aug 11, 2017, 08:13 AM IST
व्यंकय्या नायडू १३ व्या उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार  title=

नवी दिल्ली : १३ व्या उपराष्ट्रपती निवड झाल्यानंतर व्यंकय्या नायडू आज उपराष्ट्रपदासाठी शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.

आज सकाळी १०वाजता त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. शपथविधीपूर्वी व्यंकय्या नायडू राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतील. त्यानंतर दीनदयाळ उपाध्याय मार्गावर दीनदयाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार आर्पण करतील. नंतर पटेल चौकातील सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन शपथविधीला उपस्थित रहातील.

राष्ट्रपती भवनामध्ये त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. संसदीय कार्यमंत्री आणि राज्यमंत्री त्यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करतील.