VIDEO : जय हिंद ऐवजी अल्ला हु अकबरच्या घोषणा; प्रजासत्ताक दिनी विद्यापीठात धक्कादायक प्रकार

Aligarh Muslim University : विद्यापिठाच्या कुलगुरुंनी राष्ट्रध्वज फडकावताच विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी अल्ला हु अकबर असे व्हायरल व्हिडीओमध्ये अशा घोषणा देताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली असून कारवाई करण्याच्या सूचना विद्यापीठाला दिल्या आहेत

Updated: Jan 27, 2023, 10:30 AM IST
VIDEO : जय हिंद ऐवजी अल्ला हु अकबरच्या घोषणा; प्रजासत्ताक दिनी विद्यापीठात धक्कादायक प्रकार title=

Republic Day 2023 : देशभरात गुरुवारी 74वा प्रजासत्ताक दिन (Republic Day) उत्साहात साजरा करण्यात आलाय. राजधानी दिल्लीत (Delhi) पथसंचलनातून भारताने आपली ताकद दाखवली आहे. विविध सरकारी कार्यालये, महाविद्यालयांमध्ये देखील प्रजासत्ताक दिन साजरा करण्याता आलाय. मात्र अलिगढ मुस्लिम विद्यापीठात (Aligah Muslim University) झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. तिरंगा फडकावल्यानंतर विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांनी धार्मिक घोषणा दिल्याच्या व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. पोलीस प्रशासनाने (Police) देखील या प्रकरणाची दखल घेतली असून कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.

त्यामुळे अलीगड मुस्लिम विद्यापीठ पुन्हा एकदा वादात सापडले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यापीठ परिसरात धार्मिक घोषणाबाजी (Religious sloganeering) करण्यात आली. हे प्रकरण आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखीनच पेटले आहे. पोलीस प्रशासनाने याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधून घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाची चौकशी करून ३ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश विद्यापीठ प्रशासनाने दिले आहेत. 

कुलगुरुंच्या समोरच घोषणाबाजी

प्रजासत्ताक दिनानिमित्त अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरू तारिक मन्सूर यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. तिरंगा फडकवताच  काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंच्या उपस्थितीतच अल्ला हु अकबरच्या घोषणा दिल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डझनभराहून अधिक विद्यार्थी धार्मिक घोषणा देताना दिसत आहेत. कुलगुरू तारिक मन्सूरही तिथेच उपस्थित असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहेत.

नेमकं काय झालं?

"या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नारे तकदीर अल्ला हु अकबरच्या घोषणा दिल्या. ही एक लढाईची आणि धार्मिक घोषणा आहे. ही घोषणा त्यांची विचारसरणी दर्शवते. अशा घोषणा देऊन तुम्ही कोणता संदेश द्यायचा प्रयत्न करत आहात? आज संपूर्ण देश भारतीय राज्यघटनेसमोर नतमस्तक झाला आहे. अशा परिस्थितीत या पद्धतीच्या घोषणा देत ते भारतात मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत," अशी प्रतिक्रिया विद्यापिठाचे माजी विद्यार्थी डॉक्टर नितेश शर्मा यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी सुरू केली आहे. प्राध्यापक वसीम अली यांनी सांगितले, "या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रम संपल्यानंतर ही घोषणाबाजी झाली. यामध्ये कोणकोणत्या विद्यार्थ्याचा सहभाग आहे, याचा शोध सुरू आहे. विद्यार्थ्याची ओळख पटल्यानंतर सत्याच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल."