Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय

आजच्या तारखेला लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदींचंच सरकार येण्याची शक्यता आहे. सर्व्हेनुसार, लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.    

Updated: Jan 27, 2023, 10:22 AM IST
Narendra Modi की Rahul Gandhi, आज Lok Sabha निवडणुका झाल्यास कोण जिंकणार? जाणून घ्या Survey काय सांगतोय title=

Lok Sabha Election Survey: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) फक्त एक वर्ष शिल्लक असून देशात पुन्हा एकदा मोदी सरकार (Narendra Modi led NDA Government) येणार की सत्तापालट होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या 'भारत जोडो यात्रे'ला (Bharat Jodo Yatra) जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असला तरी त्याचं रुपांतर मतात होणार की नाही हे पाहावं लागेल. दरम्यान सध्या देशातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील NDA सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं सर्व्हेमधून समोर आलं आहे. 

या सर्व्हेनुसार, आज जर लोकसभा निवडणूक झाली तर भाजपाला 284 जागा मिळतील असा अंदाज आहे. दरम्यान काँग्रसेला 191 जागांवर विजय मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या सर्व्हेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असून तब्बल 72 टक्के लोक त्यांच्या कामावर समाधानी असल्याचं समोर आलं आहे. 

67 टक्के लोक NDA वर समाधानी

वाढती महागाई, करोनाची लाट तसंच इतर मुद्द्यांवरुन विरोधक घेरत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील NDA सरकार सत्ताविरोधी लाट रोखण्यात यशस्वी ठरत असल्याचं चित्र आहे.
 
मोदी सरकार गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रात सत्तेत आहे. सर्व्हेत सहभागी झालेल्या 67 टक्के लोकांनी जानेवारी महिन्यातील कामगिरीवर समाधानी असल्याचं सांगितलं आहे. ऑगस्ट 2022 च्या तुलनेच या आकडेवारीत वाढ झाली आहे. ही आकडेवारी 11 टक्क्यांनी वाढली आहे. India Today-CVoter च्या या सर्व्हेत 1,40,917 लोक सहभागी झाले होते. 

ऑगस्ट 2022 मध्ये झालेल्या सर्व्हेत 37 टक्के लोकांनी एनडीएच्या कामकाजावर नाराजी जाहीर केली होती. ही आकडेवारी कमी झाली असून 18 टक्क्यांवर पोहोचली आहे. 

NDA ची सर्वात मोठी कामगिरी

सर्व्हेत सहभागी झालेल्यांना एनडीए सरकारचं सर्वात मोठं यश कोणतं असं विचारण्यात आलं होतं. 20 टक्के लोकांनी सरकारने ज्याप्रकारे करोनास्थिती हाताळली त्यावर समाधान व्यक्त केलं. तर 14 टक्के लोकांनी जम्मू काश्मीरमधून 370 कलम हटवणं सर्वात मोठी कामगिरी असल्याचं सांगितलं आहे. तर 12 टक्के लोकांनी अयोध्येत राम मंदिर उभारणं हे मोदी सरकारचं सर्वात मोठं यश असल्याचं म्हटलं आहे. 

NDA चं सर्वात मोठं अपयश

एनडीएच्या सर्वात मोठ्या अपयशाबद्दल विचारण्यात आलं असता, 225 टक्के लोकांनी वाढती महागाई असं उत्तर दिलं. तर 17 टक्के लोकांनी मोदी सरकारने बेरोजगाराशी संबंधित प्रश्न योग्यप्रकारे हाताळला नसल्याचं म्हटलं आहे. 8 टक्के लोकांनी करोनास्थिती हाताळण्यात एनडीए सरकार अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे.