Flight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral

Biman-Bangladesh Flight Viral Video : विमानात प्रवासादरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून प्रवाशांनी एकमेकांचे कपडे फाडून हाणामारी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Updated: Jan 11, 2023, 03:36 PM IST
Flight Fighting Video: आधी कपडे फाडले मग लाथाबुक्क्यांनी एकमेकांना तुडवलं, विमानात नक्की काय घडलं? Video Viral   title=

Flighting in Flight Viral Video : एअर इंडियाच्या विमानात मद्यधुंद पुरूष प्रवाशाने लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच विमानात आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुन्हा एकदा विमानात गैरप्रकार घडल्याचा प्रकार समोर आला असून या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (video viral) होत आहे. 

बिमन बांगलादेश एअरहलाइन्सच्या (Biman - Bangladesh Flight) विमानात दोन प्रवाशांमध्ये बाचाबाची झाली. यामधील धक्कादायक बाब म्हणजे एका प्रवासाने शर्ट (shirtless) देखील घातले नव्हते. बाचाबाची हा व्हिडिओ एअरलाईन क्रु म्हणून काम करणाऱ्या बितांको बिस्वास नावाच्या व्यक्तीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.  

व्हायरल व्हिडिओमध्ये एक विना शर्टचा प्रवासी विमानातील दुसऱ्या प्रवाशासोबत मारामारी करत असताना दिसून येत आहे. विना शर्टचा प्रवासी दुसऱ्या प्रवासाला ठोसे मारताना दिसत आहे. विमानातील इतर प्रवासी आणि क्रु मेंबर हे भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या भांडणांचा कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

'आणखी एक अनियंत्रित प्रवासी, यावेळी विमान बांगलादेशच्या बोईंगस 777 फ्लाइटमध्ये!', अशी कॅप्शन व्हिडिओ शेअर करताना बितांको बिस्वास यांनी दिली आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी आपलं मते मांडली आहे. एका युजर्सने तर कमेंट बॉक्स मध्ये लिहिले की, जर असे वारंवार होत असेल तर, विमानात अल्कोहोल देणे बंद करा... दरम्यान विमानात प्रवासादरम्यान भांडणं, हाणामारी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या पहिलेही अशा घटना समोर आल्या आहेत. 

काही दिवसांपूर्वीच न्यूयॉर्कहून दिल्लीच्या दिशेने येत असलेल्या विमानात एका प्रवाशाने महिलेच्या तोंडावर लघुशंका केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यानंतर दिल्लीहून पाटण्याला जाणाऱ्या विमानात मद्यधुंद प्रवाशांमध्ये मारामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानातही हाणामारीची घटना समोर आल्यामुळं विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.