Viral Video - रेल्वे स्टेशन आणि त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना असे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. धावत्या रेल्वेत चढताना पाय घसरणे, एका रेल्वे ट्रकवरुन दुसऱ्या रेल्वे ट्रकवर जाताना घडलेली दुर्घटना असं अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. अंगावर शहारा आणणाऱ्या आणि धक्कादायक अशा या घटना असतात. या दुर्घटनेत अनेक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर काही जणांसाठी रेल्वे स्टेशनवर असलेले जवान देवदूत ठरतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रेल्वे प्लेटफॉर्म अनेक प्रवासी ये-जा करत आहेत. अशातच एका व्यक्तीचा अचानक पाय घसरतो आणि तो ट्रकवर जाऊन पडतो. तेवढ्यात समोरुन एक ट्रेन मोठ्या वेगाने त्या ट्रकवरुन येत असते. त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता. हे थरारक दृश्य दिसतात एक व्यक्ती देवासारखी त्याच्याकडे धावून जातो आणि मोठ्या शिताफीने त्याला प्लेटफॉर्मवर खेचतो. हा देवदूत दुसरा कोणी नसून प्लेटफॉर्म असलेल्या आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे या व्यक्तीचे प्राण वाचले.
कुठली आहे ही घटना
बंगळुरुमधील केआर पुरम रेल्वे स्टेशनवरील हा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तर रेल्वे मंत्रालयाने हा व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. 28 सेकंदच्या या व्हिडीओला आतापर्यंत 88 हजार अधिक वेळा पाहिला गेला आहे.
आरपीएफ जवानाला कडक सॅल्युट...
Prompt response by RPF personnel saved the precious life of a man who slipped and fell on tracks minutes before the arrival of a train at KR Puram Railway Station, Bengaluru. pic.twitter.com/P0CXy3JfvH
— Ministry of Railways (@RailMinIndia) July 16, 2022