कोट्यवधींची संपत्ती, खासदार असतानाही आमदारकी लढवली, कोण आहेत राजस्थानच्या या राजकुमारी?

Diya Kumari Net Worth: राजस्थान विधानसभा निवडणुक निकालांची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली आहे. काहीच तासांत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 3, 2023, 12:55 PM IST
कोट्यवधींची संपत्ती, खासदार असतानाही आमदारकी लढवली, कोण आहेत राजस्थानच्या या राजकुमारी? title=
Vidhyadhar Nagar assembly seat result bjp Princess diya kumari Net worth

Diya Kumari Net Worth: पाच राज्यांत पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आज आहे. राजस्थानमध्ये मतमोजणीच्या कलांमध्ये भाजपने 100 जागांचा टप्पा ओलांडला आहे. तर काँग्रेस पिछाडीवर आहे. राजस्थानमध्ये सत्तांतराचे संकेत मिळत असतानाच एका उमेदवाराची चर्चा होत आहे. जयपुरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून भाजप खासदार दीया कुमारी यांनी निवडणुक लढवली होती. तर, दीया कुमारी यांच्याविरोधात काँग्रेसने सीताराम अग्रवाल यांना तिकिट दिले होते. आत्तापर्यंत झालेल्या मतमोजणीत दीया कुमारी आघाडीवर आहेत. राजस्थानात वसुंधरा राजे यांच्यासोबतच दीया कुमारी यांचे नावही चर्चेत आहे. कोण आहेत दीया कुमारी आणि त्यांची संपत्ती जाणून घेऊया. 

2013मध्ये सवाईमाधोपुर मतदारसंघातून दीया कुमारी यांनी आमदारकी मिळवली होती. त्या  खासदारही आहेत आणि आता पुन्हा एकदा विधानसभेसाठी भाजपने त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. जयपुरच्या राजकुमारी दीया कुमारी या महाराजा सवाई सिंह आणि महाराणी पद्मिनी देवी यांच्या कन्या आहेत. दीया कुमारी या ज्या मतदारसंघातून उभ्या आहेत तो भाजपचा गढ मानला जातो. त्यामुळं विद्याधर नगर मतदारसंघातून दीया कुमारी यांचा विजय निश्चित मानला जातोय. 

दीया कुमारी यांचे पुर्वज मान सिंह (द्वितीय) जयपुर राजघराण्याचे अखेरचे महाराजा होते आणि मुगल बादशाह अकबर यांच्या नवरत्नापैकी एक होते. जयपुर राजघराणं स्वतःला भगवान राम यांचे वंशजही मानतात. 

23 जानेवारी 1971 रोजी जन्म झालेल्या दीया कुमारी यांचे सुरवातीचे शिक्षण दिल्लीतील प्रसिद्ध मॉर्डन स्कुल आणि मुंबईतील जीडी सोमानी मेमोरियल शाळा, महाराणी गायत्री देवी गर्ल्स पब्लिक स्कुल येथून झाले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या लंडन येथे गेल्या. पार्संस आर्ट अँड डिझाइन स्कुल (Parsons Art and Design School) मधून 1989 मधून फाइन आर्ट्स डेकोरेटिव्ह पेटिंगमध्ये डिप्लोमातून पदवी प्राप्त केली आहे. 

करोडो संपत्तीची मालकिण आहेत दीया कुमारी

दीया कुमारी या करोडो संपत्तीच्या मालकिण आहेत. 2019मध्ये जेव्हा त्यांनी राज्यसमंद लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या तेव्हा त्यांनी निवडणुक आयोगाकडे जारी केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीबाबत नमूद केले होते. दीया कुमारी यांच्याकडे 16 कोटींपेक्षा (6,59,84,623) अधिक संपत्ती आहे. त्यांच्याकडे जवळपास 12.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर, त्यांच्याकडे जंगम मालमत्ता नसल्याचे त्यांनी नमूद केलं आहे. 

4 वर्षांपूर्वी दीया कुमारी यांनी त्यांच्या संपत्तीबाबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रकात नमूद केल्याप्रमाणे, त्यांच्याकडे बँक खात्यात 2 कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम आहे. तर, 12 कोटींपेक्षा जास्त संपत्ती त्यांनी गुंतवणूक केली आहे. जयपूर पॅलेस हॉटेल, सिंपल रियल स्टेट अँड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, श्रीराधा गोविंद जी कंस्ट्रक्शन एंड रिलेटर्स प्राइवेट लिमिटेड आणि काही म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवणुक केलीली आहे. दीया कुमारी यांनी एक कोटींहून अधिक रक्कम एलआयसी आणि इन्शुरंन्समध्ये गुंतवलेली आहे. 

दीया कुमारी यांनी दागिन्यांमध्येही गुंतवणुक केली आहे. त्यांच्याकडे जवळपास 65 लाख रुपयांचे सोने आहे. दीया कुमारी यांच्याकडे त्यांच्या नावावर कोणतीही जमिन किंवा रेशिडेन्शियल प्रॉपर्टी नाहीये. तसंचे वाहनही त्यांच्या नावावर नाहीये.