जिद्दीला सलाम! 5 महिन्यांची मेहनत आणि 1 मिनिटांत तोडला रेकॉर्ड

कुटुंबाक आनंदाचं वातावरण....

Updated: Jun 21, 2021, 08:12 AM IST
जिद्दीला सलाम! 5 महिन्यांची मेहनत आणि 1 मिनिटांत तोडला रेकॉर्ड

मुंबई : रजधानी दिल्ली येथील गुरुग्राम शहरात राहणाऱ्या 11 वर्षीय विकरुती शर्माच्या (Vikruti Sharma) जिद्दीला खरचं सलाम. विकरूतीने एका मिनिटांत 18 एडव्हांस योगासन करत इतिहास रचला आहे.  विकरुतीची कामगीरी लक्षात घेत तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) देखील जागा मिळाली आहे. फक्त 5 महिने सराव करत तिने निरालांबा पूर्ण चक्रासन केल्यामुळे तिला हा सम्मान मिळाला आहे. 

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डकडून विकरूतीला तिच्या कामाचं प्रमाणपत्र देखील मिळालं आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड 2017 साली मैसूरच्या खुशी नावाच्या मुलीला मिळाला होता. ज्यामध्ये खुशीने 1 मिनिटांत 15 आसन केले होते. पण 2021 साली विकरूतीने सर्व रेकॉर्ड मोडत एका मिनिटांन 18 बॅक प्लँक रिक्लाइन क्रंचेज (Back Plank Recline Crunches)करत स्वतःचं आणि कुटुंबाचं त्याचप्रमाणे देशाचं नाव मोठं केलं आहे. 

विकरूतीच्या योगा प्रशिक्षक म्हणाल्या की, 'विकरूती गेल्या 5 महिन्यांपासून सगल एडव्हांस योगासन करण्याचा सराव करत आहे. तिची जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तचं  27 एप्रिल 2021 साली इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव पोहोचलं. ' विकरूतीच्या योगा प्रशिक्षकांचं नाव रेनू शर्मा असं आहे. 

त्या पुढे म्हणाल्या, 'विकरूतीने केलेलं आसन करण्यासाठी शरीर लवचीक असणं अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळे फार कमी लोक हे आसन करू शकतात. पण फक्त 11 वर्षात  उत्तम कार्य केल्यामुळे मी आणि विकरूतीचे कुटुंब फार आनंदी आहोत. '