चिमुकलीला मिळाली नवी ओळख, सोशल मीडियावरील Viral Couple च्या नावाने मारली जाणार हाक

या व्हायरल कपलसाठी त्यांच्या एका फॅनने अशी गोष्ट केलीये जी पाहून या जोडीला ही विश्वास बसला नाही.

Updated: Jul 10, 2021, 12:18 PM IST
  चिमुकलीला मिळाली नवी ओळख, सोशल मीडियावरील Viral Couple च्या नावाने मारली जाणार हाक title=

मुंबई : सोशल मीडियावर दर दिवशी काहीना काही चर्चेत असतं. सध्या सोशल मीडिया हे जणू व्हायरल होण्याचं आणि मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचण्याचं स्वस्त  आणि सोपं माध्यम बनलं आहे. याच सोशल मीडियाचा वापर करुन अनेकजण आपलं टॅलेंट कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू शकत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियाचा सर्वांत जास्त वापर दिसून आला. अनेकांनी आपलं टॅलेंट पोस्टद्वारे रिवील करत घराघरात एंटरटेनमेंट तडका दिला.

काहींनी  आपल्या गोड आवाजाने नेटकऱ्यांना आपल्या प्रेमात पाडलं , तर काहींनी दमदार अभिनयाच्या जोरावर हटके व्हिडिओ शेअर करत घरी बसलेल्यां प्रेक्षकांचं चांगलंच  मनोरंजन केलं. त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्ये देखील वेगाने वाढ झाली.

असंच एका मराठमोळ्या कपलने देखील आपल्या कॉमेडी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. या कपलची क्रेझ इतकी वाढली की अनेकांनी  त्यांची मिमिक्री देखील करायला सुरुवात केली. त्यात या व्हायरल कपलसाठी त्यांच्या एका फॅनने अशी गोष्ट केलीये जी पाहून या जोडीला ही विश्वास बसला नाही.

या व्हायरल कपलच्या प्रेमात असलेल्या फॅन दाम्पत्याने नुकतच जन्माला आलेल्या आपल्या बाळाचं नावं प्रसिका असं ठेवलंय. 'प्रसिका' हे या व्हायरल झालेल्या  जोडीच्या इंस्टाग्रामचं आयडी आहे. 

प्रसाद आणि दीपिका मिळून तयार झालेलं 'प्रसिका' हे नाव सध्या सगळ्यांच्याच तोंडावर आहे. हे नाव त्यांच्या फॅनला ही एवढं आवडलं की त्यांनी आपल्या मुलीचं  नाव प्रसिका असंच ठेवलं. या फॅन दाम्पत्याने मुलीच्या बारशाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाये. प्रसाद आणि दीपिका यांना टॅग करत आपल्या मुलीचं  नावं प्रसिका ठेवल्याचं त्यांनी रिवील केलंय.  प्रशांत गावडे असं या चाहत्यांचं नावं आहे. 

हा व्हिडिओ प्रसाद आणि दीपिका या व्हायरल कपलने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केलंय. सोबतच नुतन बालिकेला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे या मराठमोळ्या  व्हायरल होत असलेल्या कपलची नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चलती पाहायला मिळतेयं.