पँट घालण्यासाठी तरुणाचा अजब स्टंट, व्हिडीओ पाहून तुम्ही याला काय म्हणाल?

हा स्टंट पाहून उद्योगपती हर्ष गोयनका देखील इम्प्रेस झाले आहेत. 

Updated: Sep 28, 2021, 06:48 PM IST
पँट घालण्यासाठी तरुणाचा अजब स्टंट, व्हिडीओ पाहून तुम्ही याला काय म्हणाल?

मुंबई: या जगात अशा काही गोष्टी घडतायत ज्या आपण प्रयत्न करूनही आपल्याला जमत नाहीत पण बऱ्याचदा त्या समोर घडत असतात. असेच काही स्टंट आहेत जे पाहायला खूप अप्रतिम आहेत. मात्र ते जीवावरही बेतण्याचा धोका आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वेगवेगळे स्टंट लोक करताना दिसत आहेत. त्यापैकी एका स्टंटची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे. 

हा स्टंट पाहून उद्योगपती हर्ष गोयनका देखील इम्प्रेस झाले आहेत. काही लोक अशक्य गोष्टी करण्यासाठी खूप सराव करतात. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात लोक खूप जास्त वेगाने भाजी कापत आहेत किंवा खूप जास्त वेगाने नोटा मोजत आहेत. असाच एक व्हिडिओ हर्ष गोएंका यांनी रिट्विट केला आहे. 14 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये विचित्र आणि धक्कादायक असे कारनामे करत आहेत.

हा युवक झोपाळ्यावर झोके घेत असताना उडी मारून पँटमध्ये पाय घालून उभा राहातो. हा स्टंट जीवावर बेतू शकतो. मात्र तो हा स्टंट खूप सफाईदारपणे करताना दिसत आहे. दोन जण पायजमा घेऊन समोर उभे आहेत. स्विंग करणारी व्यक्ती इतकी अचूक उडी मारतो की त्याचे पाय पँटमध्ये बरोबर जातात. व्हिडीओ पाहण्याइतका हा स्टंट नक्कीच सोपा नाही.

 

सूचना- असे स्टंट जीवावर बेतू शकतात त्यामुळे असे स्टंट करू नका. हा व्हिडीओ व्हायरल व्हिडीओ आहे झी 24 तास या व्हिडीओची कोणतीही पुष्टी करत नाही. 

Tags: