मुंबई : बाईक आणि स्कूटी चालवण्याची प्रत्येकाची आपली एक स्टाईल असते. परंतु मुलींची स्टाईल ही सगळ्यात भारी असते. बऱ्याचदा सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलं असेल, की लोकं मुलींच्या स्कूटी चालवण्यावरती अनेक प्रतिक्रिया देतात. पण यामागील कारण देखील तसंच आहे. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की मुली कशा प्रकारे गाडी चालवतात. या व्हिडीओला लोकांकडून मोठ्याप्रमाणात शेअर केलं जात आहे.
खरेतर हा व्हिडीओ 7/8 मुलींच्या वेगवेगळ्या व्हिडीओला एकत्र करुन बनवला गेला आहे. ज्यामध्ये मुली कशा कशा प्रकारे स्कूटी चालवतात हे दाखवलं आहे. हा व्हिडीओ खरोखरच खूप मनोरंजक आहे.
या व्हिडीओमध्ये मुली अगदी फनी स्टाईलने स्कूटी चालवत आहेत आणि शेवटी त्यांचं गाडी चालवताना हास्य होतं. हे लोकांना पाहायला फार आवडत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही त्यांचे हसू आवरू शकणार नाही.
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. यामध्ये काही मुली वेगवेगळ्या प्रसंगी स्कूटी चालवत आहेत आणि त्या गाडी चालवताना कशा पडतात. हा 20 सेकंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Scooty Girls pic.twitter.com/bZy823G1pI
— Rupin Sharma (@rupin1992) December 30, 2021
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरता येत नाही. या व्हिडीओवर तीव्र प्रतिक्रियाही येत आहेत. एका यूजरने व्हिडीओवर लिहिले आहे की, 'कुठेही फिरा पण हेल्मेट घाला. देशाचे पोलीस आणि लोक हेच सांगतात.’ आणखी एका युजरने व्हिडीओवर लिहिलं, 'मुलांनी सगळी धमाल का करावी.' व्हिडीओ पाहिल्यानंतर एका महिला ट्विटर युजरने लिहिले की, 'पप्पाची परी उडून गेली.'