महंगाई डायन खाए जात है | एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणं महागणार

रेल्वेने प्रवास (Indian Railway) करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. एक्सप्रेस रेल्वेन प्रवास करणं आता महागणार आहे. 

Updated: Jan 8, 2022, 07:08 PM IST
महंगाई डायन खाए जात है | एक्सप्रेस रेल्वेने प्रवास करणं महागणार  title=

Station Development Fee | मुंबई : लांबच्या प्रवासासाठी नेहमीच रेल्वे प्रवासाला (Indian Railway) पसंती दिली जाते. परवडणारे तिकीट दर आणि वेळेत पोहचण्याची हमी यामुळे रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. मात्र आता यापुढे रेल्वेने प्रवास करण्यासाठी खिसा आणखी हलका करावा लागणार आहे. एक्सप्रेस रेल्वेन प्रवास करणं आता महागणार आहे. (railway passengers will have to pay extra 10 to 50 rs as station development fee railway ministry has decided)
 
एक्स्प्रेस गाड्यांचं तिकीट महागणार आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेनं विमान तिकिटाप्रमाणे युजर चार्ज लागू केला आहे. त्यामुळे प्रवाशांना यापुढे 10 रूपयांपासून 50 रूपयांपर्यंत यूजर्स चार्ज द्यावा लागणार आहे. प्रवासी ज्या श्रेणीच्या डब्यातून प्रवास करतील त्यानुसार हा युजर चार्ज द्यावा लागणार आहे.

रेल्वे अपघातात वाढ

दरम्यान निर्बंध शिथिल होताच रेल्वे अपघातात वाढ झालीय. गेल्या वर्षभरात रूळ ओलांडताना 1 हजार 114 जणांचा मृत्यू झाला. तर गाड्यांमधून पडून 277 जण दगावले आहेत. अपघातात  2020 च्या तुलनेत तीनशेने वाढ झाली आहे.