वरातीत या व्यक्तीचा विचित्र डान्स पाहून घोड्याने मारली जोरदार लाथ, Video Viral

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या एका वरातीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

Updated: Jul 25, 2022, 03:05 PM IST
वरातीत या व्यक्तीचा विचित्र डान्स पाहून घोड्याने मारली जोरदार लाथ, Video Viral title=

मुंबई : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. लाखो लोकांनी हा व्हिडिओ आतापर्य़ंत पाहिला असून शेअर देखील केला आहे. इंटरनेटवर लग्नाशी संबंधित अनेक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यापैकी काही तुम्हाला खूप हसवतात तर काही आश्चर्यचकित करतता.

लग्न म्हटलं तर डान्स तर येतोच. लग्नाच्या वरातीत नाचताना काही जण विचित्रपणे नाचत असतात. त्यांना पाहून अनेकांना हसू आवरत नाही. पण ते इतरांचं मनोरंजन करत असतात. विचित्र डान्स करणं कधी कधी स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं असतं. कसं ते तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कळेलच.

हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही हसला असाल. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मिरवणुकीत विचित्र डान्स स्टेप्स करताना दिसत आहे. या दरम्यान घोड्याला ही त्याचा हा डान्स आवडला नाही अशा कंमेट लोकं करत आहेत. 

घोड्याला देखील या व्यक्तीच्या डान्स स्टेप्स आवडला नाही. घोड्याने जोरदार लाथ मारल्यानंतर तो जमिनीवर कोसळला. ज्यात तो जखमी ही झाला.