कारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्...; Video ला 1 कोटी Views

Jugaad Video : बाइक स्टंटचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वरच्यावर व्हायरल होत असतात. नुकताच सोशल मीडियावर ट्रेंडिंग झालेल्या व्हिडीओला 1 कोटी Views मिळाले आहेत. 

नेहा चौधरी | Updated: Nov 10, 2023, 04:10 PM IST
कारलाही लाजवेल असा बाइकस्वाराचा 'कार'नामा! आईने तरुणीला मांडीवर घेतलं अन्...; Video ला 1 कोटी Views title=
viral video indian middle class jugaad 4 people travelling on bike video goes trending on social media

Bike Viral Video : इंटरनेटच्या दुनियेत कधी कुठला व्हिडीओ व्हायरल होईल सांगता येणार नाही. या दुनियेत बाइकवर स्टंट करणारे असंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. सोशल मीडियावर मनोरंजक व्हिडीओ पाहिला मिळतात. ते व्हिडीओ फक्त मनोरंजनासाठी नसतात तर यावरून अनेक जण पैसे कमाई करतात. असं म्हणतात भारतीय लोक जुगाड करण्यात हुशार असतात. या सोशल मीडियावर भारतीयांच्या जुगाडाचे बहुसंख्य व्हिडीओ पाहिला मिळतात. सध्या सोशल मीडियावर भारतीयांचा असाच एक व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाला आहे. (viral video indian middle class jugaad 4 people travelling on bike video goes trending on social media)

 बाइकस्वाराचा 'कार'नामा!

भारतात कुटुंब मोठी असतात, मग या कुटुबांच्या समस्या आणि त्यावरील उत्तरं याचे अनेक जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुटुंबात चार लोकं आई वडील मुलगा मुलगी. भारतात स्कूटर किंवा बाइकवरुन चार जणांच्या कुटुंबाचा प्रवास यात काही नवलं नाही. मध्यंतरी एका बाइकवरुन तब्बल सात ते आठ जणांनी केलेला प्रवासाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

मग या व्हिडीओमध्ये काय खास आहे? तर तुम्हाला आम्ही सांगतो की, या कुटुंबातील मुलं खूप मोठे आहेत. तरी त्या स्कूटरवर त्या चौघांनी कसालही विचार केला नाही. अगदी वाहतूक नियम धाब्यावर बसून त्यांनी प्रवास केला. स्कूटर चालविणाऱ्या मागे एक मुलगा आणि एक महिला बसली आहे. तर त्या महिलेच्या मांडीवर मोठी मुलगी बसली आहे. हा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहे. 

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरील @purnia_parivar या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं आहे की, हे काय झालं? तर हा व्हिडीओ बिहारच्या पूर्णियामधील असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 1 कोटींहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाख 75 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओवर कंमेट बॉक्समध्ये नेटकऱ्यांनी तुफान प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे की, भारत सरकारने त्याला पुरस्कार द्यावा. तर दुसरा म्हणाला की, त्यांची चेष्टा करू नका... ही अवस्था मध्यमवर्गीय लोकांची आहे. तर काहींनी धोका पत्करू असा सल्ला दिला आहे.