पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल... अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. हा मुलगा पाळण्यात बसला आहे. ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे.

Updated: Mar 16, 2022, 04:09 PM IST
पाळण्यात बसण्याचा आनंद क्षणार्धात मातीमोल... अशी झाली या मुलाची अवस्था, पाहा व्हिडीओ title=

मुंबई : सोशल मीडीया हे मनोरंजनाचा भंडार आहे. येथे तुम्ही कधीही आलात तरी तुम्हाला असे मनोरंजक व्हिडीओ पाहायला मिळतील की, तुम्हाला ते पोट धरुन हसायला भाग पाडतील. हे व्हिडीओ खरंच इतके मनोरंजक असतात की, तो पाहाण्यात कधी तासन तास निघून जातात हे आपल्याला कळत नाही. येथे तुम्ही एकादा का आलात की, संपलंच सगळं. तुम्ही कितीही मनात विचार केलात की, मला आता हे बंद करायचं आहे, तरी देखील तुम्हाला ते करता येणार नाही.

पण काहीही असो, येथे आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची माहिती देखील मिळते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा काहीसा वेगळा आहे. जो तुम्हाला पोट धरुन हसायला भाग पाडेल.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ एका लहान मुलाचा आहे. हा मुलगा पाळण्यात बसला आहे. ज्यामुळे त्याला खूप आनंद झाला आहे.

लहान मुलांना पाळण्यात बसायला आवडते. ज्यासाठी ते नेहमीच आपल्या पालकांकडे हट्ट करतात. या मुलाने देखील कदाचित असंच केलं असावं. ज्यामुळे त्याला जेव्हा पाळण्यात बसायला मिळालं तेव्हा त्याला खूपच जास्त आनंद झाला. परंतु त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कारण जेव्हा पाळणा सुरू झाला, तेव्हा मात्र या मुलाचे सुर जे काही बदलले की बस रे बस. या लहान मुलाला अक्षरशा आपले संपूर्ण खांनदान आठवलं. ज्यामुळे तो सगळ्यांना हाका मारुन हा पाळणा थांबवायला बोलू लागला.

हा लहान मुलगा देवापासून सगळ्यांना आठवू लागला, ज्यानंतर काका, काकू, मावशी सगळ्यांची आठवण काढत पाळणा थांबवण्याची विनंती करु लागला, मात्र पाळणा काही थांबलाच नाही.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या लहान मुलाचं हे बोलणं आणि त्याची शैली सगळ्यांना आवडली आहे. ज्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताच भलताच व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ giedde नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओवर भरभरुन कमेंट्स देखील केले आहेत.