Video : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्... पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश

Lucknow Lift Viral Video : लखनऊमधून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अल्पवयीन मुलगी (School Girl trapped in Lift) लिफ्टच्या आतून दरवाजा वाजवताना ओरडताना आणि मदतीची याचना करताना दिसत आहे.

Updated: Oct 4, 2023, 08:58 PM IST
Video : पालकांनो, मुलांना एकटं सोडू नका! लिफ्टमध्ये शाळकरी मुलगी अडकली अन्... पाहा 133 सेकंदाचा चिमुकलीचा आक्रोश title=
School Girl trapped in Lift Lucknow Viral Video

School Girl trapped in Lift : कुटूंबाचं परिचित्र बदलल्यानंतर आता विभक्त कुटुंब पद्धती अनेक ठिकाणी दिसून येतात. नवरा आणि बायको दोघंही कामाला जात असल्याने घराकडे, मुलांकडे अनेकदा दुर्लक्ष होतं. अशातच आता लखनऊमधून (Lucknow News) एक धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून पालकांच्या मनात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही. लखनऊमध्ये एक शाळकरी मुलगी (School Girl trapped) लिफ्टमधून घरी जात असताना लिफ्टमध्ये तब्बल 20 मिनिटं अडकल्याची घटना घडली. त्याचा सीसीटीव्ही (CCTV Video) व्हिडीओ आता समोर आला आहे.

बुधवारी लखनऊमध्ये एक मोठी दुर्घटना टळली. एक लहान मुलगी लखनऊच्या गौराबाग भागात अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या आत लिफ्टमध्ये बराच वेळ अडकली. घरी जात असताना ती तब्बल 20 मिनिटं लिफ्टमध्ये अडकली. त्यावेळी नेमकं काय झालंय, हे तिला कळेना. आपण अडकल्याचं लक्षात आल्यानंतर मुलीने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रथम ती लिफ्टचे दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करते. 

लिफ्टी दारं आपल्याला उघडणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर ती लिफ्टच्या आतील कॅमेऱ्याकडे वळते अन् हात जोडून वाचवण्य़ाची विनंती करते. त्यावेळी तिचा केवीलवाणा चेहरा तिच्या मनातील भीती दर्शवत होता. थोड्या वेळाने तिची भीती आणखी वाढते अन् तिने वेड्यासारखं नाचायला सुरूवात करते. मात्र, त्याचाही काही फायदा होत असल्याचं पाहून ती पुन्हा लिफ्टच्या दरवाज्याकडे जाते अन् पुन्हा प्रयत्न करते. मुलाने लिफ्टचे दरवाजे विरुद्ध टोकाने खेचून स्वतः उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यात पुरेशी ताकद नव्हती. 

पाहा VIDEO

दरम्यान, कुर्सी रोडवरील जनेश्वर एन्क्लेव्हमधील अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये ही घटना घडली. घाबरलेली मुलगी किंचाळताना आणि मदतीची याचना करताना दिसते. अखेर मुलीची सुटका करण्यात आली. मुलीची सुटका झाल्यानंतर तिच्या पालकांना झालेली घटना सांगण्यात आली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट करत पालकांना हा संदेश असल्याचं म्हटलं आहे.