Viral Video : नखरेवाली कुठे निघाली? चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण

Viral Video of Cute Girl : बालपण पुन्हा मिळावं, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशातच सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ तुम्हाला तुमच्या बालपणाची आठवण करून देईल.

सौरभ तळेकर | Updated: Aug 23, 2024, 10:38 PM IST
Viral Video : नखरेवाली कुठे निघाली? चिमुकलीचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही आठवेल बालपण title=
Viral Video of most happiest girl

Viral Video of happiest girl : लहानपण देगा देवा.. मुंगी साखरेचा रवा.. या ओळी तुम्हीही कोणाच्या तरी तोंडी ऐकल्या असतील. स्वप्नातील एक सुंदर जग अशी ओळख असलेल्या या बालपणाने मनात खोलवर रुजवली. जितकं गोड आणि निरागस तितकंच अल्लड असं हे बालपण प्रत्येकाच्या आयुष्याच्या आठवणींच गाठोडं असतं. कधी मन जड झालं की या गाठोड्यातील शिदोरी मनाचा भार हलका करते. ना कोणत्या गोष्टीचा लोड ना कोणत्या गोष्टीची काळजी... अशातच सोशल मीडियावर एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवलं आहे.

अज्ञानात सुख असतं असं म्हटलं जातं. बालपणी अनेकांनी याचा अनुभव घेतला असेलच. जसं जसं मुलांना गोष्टी समजायला लागतात तसतसं नकारात्मकता वाढते अन् मुलं शांत होतात. पण ज्यांनी ज्यांनी बालपण मनापासून जगलंय, त्यांनी आयुष्य जगलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काळानुसार चिमुकल्याचं बालपण मोबाईल आणि टीव्हीमध्ये मिसळून गेलंय. मात्र, सध्या व्हायरल झालेला व्हिडीओ नक्कीच तुम्हाला विचार करायला लावणारा आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसतंय की, एक चिमुकली आपल्या वडिलांच्या गाडीवर उलट्या पद्धतीने बसली आहे. आपल्या वडिलांच्या पाठीला पाठ लावून प्रवासाचा आनंद लुटताना चिमुकली दिसतीये. त्याचवेळी एक कार चालक जात असतो. कारमधील बसलेल्या व्यक्तींना पाहून चिमुकली नखरेल अदा दाखवतीये. जणू काही कारमधून कुणी तिचा फोटो काढतंय. पण कार चालकाने देखील चिमुकलीला निराश केलं नाही. चालकाने अपर फ्लॅश देऊन चिमुकलीचा एक निश्रृत फोटो काढला. हा व्हिडीओ कर्नाटकमधील असल्याचं अंदाज वर्तवली जातोय.

दरम्यान, जीवनाचा आनंद घेणे विनामूल्य नाही. मानवी दुर्बलता आणि जीवनातील विविध दुःखांना सतत गिळण्याची त्याची किंमत कळते, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर मुलीला असं गाडीवर उलटं बसवणं जीवावर बेतू शकतं. पालकांनी याची काळजी घ्यायला हवी, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर बालपण नक्कीच निरागस असतं. आयुष्यात अशा लहान लहान गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे, असंही काहींनी सोशल मीडियावर मत मांडलंय.