मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...

Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 22, 2024, 08:19 AM IST
मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात... title=
Viral video of old man kept a Karwa Chauth fast for Mia Khalifa

Mia Khalifa Karwa Chauth: उत्तर भारतात करवाचौथ महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. पतीच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी महिला हे व्रत करतात. तर काही पतीदेखील त्यांच्या पत्नीसाठी हे व्रत करतात. 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात करवाचौथचा व्रत साजरे करतात. करवाचौथचा सण साजरा करत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्धाने पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलीफासाठी करवाचौथची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एक्स (ट्विटर)वर गुरुजी नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरुन अनेकदा असेच मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले जातात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वृद्धाच्या हातात पारंपारिक थाळी आणि चाळणी आहे. तसंच, त्याने सफेद रंगाचे धोतर परिधान केले आहे. सुरुवातीला एका भिंतीवर त्याने मिया खलिफाच्या फोटो लावला आहे. त्यानंतर चाळणीसमोर ठेवून त्याने मिया खलिफाच्या फोटोकडे पाहिले. 

व्हिडिओवर अनेक भन्नाट कमेंट्स 

व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, दुखःची गोष्ट म्हणजे इतका सुंदर सण आता फक्त दिखावा आणि लाइक्ससाठीच साजरा करत आहेत. एका अन्य व्यक्तीने म्हटलं आहे की, वृद्ध व्यक्ती त्यांच्या नातवंडामुळं प्रभावित झाले आहेत. तर एकाने म्हटलं आहे की, हे सर्व त्यांच्या नातवंडानी केलेले असून फक्त लाइक्स अँड एंगेजमेंटसाठी आहे. तर, काही युजर्सने हा व्हिडिओ फार मजेशीर अंदाजात घेतला आहे. हे खूप मजेदार आहे तर एक अन्य माणसाने म्हटलं आहे की, या व्हिडिओमुळं मला हसायला भाग पडलं. 

पहिल्यांदाच नाही जेव्हा मिया खलिफाच्या फोटोमुळं भारतात वाद निर्माण झाला आहे. ऑगस्टमध्ये तामिळनाडूमध्ये कांचीपुरममध्ये होर्डिंगवर मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला होता. या होर्डिंगवर स्थानिक देवतांच्या फोटोंच्या बाजुलाच मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला होता. ज्यामुळं मोठा वाद उफाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे हॉर्डिंग हटवले होते.