शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या 'मी तर फक्त...'

Viral Video: पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अप्लाइड सायकॉलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या कथितपणे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसत आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jan 29, 2025, 09:16 PM IST
शिक्षिकेने वर्गातच विद्यार्थ्याशी केलं लग्न, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाल्या 'मी तर फक्त...' title=

Viral Video: पश्चिम बंगालच्या मैलाना अबुल कलाम आझाद युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील अप्लाइड सायकॉलॉजी विभागाच्या प्रोफेसर डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये त्या कथितपणे पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यासह लग्न करताना दिसत आहेत. व्हिडीओत प्रोफेसर एखाद्या नववधूप्रमाणे सजलेली दिसत आहे. तसंच गळ्यात हार असून, विद्यार्थी भांगेत कुंकू भरताना दिसत आहे. 

व्हिडीओच्या व्यतिरिक्त एक हस्तलिखित 'विवाह नोंदणी प्रमाणपत्र'देखील व्हायरल झालं आहे. यामध्ये तीन साक्षीदारांसह विद्यार्थी आणि शिक्षिकेचेही सही आहे. ही घटना समोर आल्यानंतर युनिव्हर्सिटीने कारवाई केली असून, शिक्षिकेला सुट्टीवर पाठवलं आहे. 

शिक्षिकने मांडली आपली बाजू

वाद निर्माण झाल्यानंतर शिक्षिकेने आपली बाजू मांडली आहे. हे लग्न नव्हतं, तर फ्रेशर्स पाटीसाठी बसवण्यात आलेलं एक नाटक होतं असा दावा डॉक्टर पायल बॅनर्जीने केला आहे. हा व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने लीक झाला असून, आपल्याला बदनाम करण्यासाठी कट रचण्यात आला असा आरोप त्यांनी केला आहे. 

डॉक्टर पायल बॅनर्जी यांनी म्हटलं आहे की, हे फक्त एक नाटक होतं, जे चुकीच्या पद्धतीने व्हायरल करण्यात आलं. काही विद्यार्थ्यांनी जाणुनबुजन हे व्हायरल केलं आहे. मी त्या विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे. 

युनिव्हर्सिटीचं नेमकं काय म्हणणं आहे?

युनिव्हर्सिटीचे कार्यवाहक कुलपती तपस चक्रवर्ती यांनी ही घटना स्विकारली जाऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. तसंच याप्रकरणी तपास समिती गठीत करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर हा फक्त एका प्रोजेक्टचा भाग होता तर मग विभागाध्यक्षाला सुट्टीवर का पाठवण्यात आलं?

शिक्षक संघटनेने दाखल केली तक्रार

युनिव्हर्सिटीमधील एक प्रोफेसर सुशांतो काय यांनीही डॉक्टर पायल बॅनर्जी यांचा दावा फेटाळून लावला आहे. शिक्षकांच्या समितीनेही याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तपास समिती या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x