अति उत्साह पडला महागात, डान्स करताना महिलेचा खरा चेहरा समोर, पाहा Funny Video

सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Updated: Nov 3, 2021, 07:28 PM IST
अति उत्साह पडला महागात, डान्स करताना महिलेचा खरा चेहरा समोर, पाहा Funny Video title=

मुंबई : सोशल मीडियावर डान्सचे मजेदार व्हिडीओ दिवसेंदिवस व्हायरल होत असतात. या व्हिडीओजमध्ये अनेकवेळा प्रतिभावान लोकांच्या डान्स स्टेप्स पाहून आपण आश्चर्यचकित होतो, तर कधी कधी डान्स करताना लोकांसोबत असा काही प्रकार घडतो की, ज्यामुळे त्यांची फजेती होते. परंतु हे असे व्हिडीओ युजर्ससाठी खूप मनोरंजक असतात. लोकं अशा प्रकारच्या फनी व्हिडीओची खूप मजा घेतात आणि आपल्या मित्रांना देखील ते पाठवत असतात.

सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ते पाहिल्यानंतर तुम्हालाही क्षणभर हसून फुटेल. या व्हिडीओमध्ये महिला डान्स करत आहे, डान्सदरम्यान तिला एक अशी मुव्ह करायची असते, जे पाहूण लोकं आश्चर्यचकित होतील. तिच्या या मुव्हने लोकं आश्चर्यचकित तर होतात, परंतु एका वेगळ्याच कारणाने.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला एका खोलीत डान्स करत आहे. तिची ही शैली पाहून तरी असे वाटत आहे की, ती प्रोफेशनल डान्सर असावी. तसेच तिने सुंदर लाईट इफेक्ट सुद्धा दिले होते. तिचा सुंदर डान्स सुरू असताना या महिलेनं असं पाऊल उचललं की, तिचं सत्य बाहेर आलं.

वास्तविक, डान्सदरम्यान महिलेने अशी स्टेप केली की तिचा केसांचा विग बाहेर आला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

यावर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, 'या प्रकारा व्यतिरिक्त महिलेचा डान्स परफॉर्मन्स खरोखरच वाखाणण्याजोगा आहे.' तर दुसऱ्या युजरने लिहिले, 'या घटनेनं सगळी मजा खराब केली.'  याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

हा व्हिडिओ '@Ffs_OMG' नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. ज्याला बातमी लिहिपर्यंत 76.3 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर, या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळाले आहेत.